
महायुती सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. राज्यातून दोन कोटी ६३ लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. दोन कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या. त्यातील दोन कोटी ३४ लाख बहिणींना विधानसभा निवडणुकीअगोदर पाच महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले. या योजनेचा महायुतीला चांगला फायदा झाला. महायुती सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ताही देण्यात आला.
मात्र, लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. या पडताळणीतून अपात्र महिलांना बाद केले जाणार असल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.
हे वाचलं का? – लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० मिळणार की २१०० रुपये? महत्त्वाची अपडेट समोर
राज्यभरातून तब्बल ४००० महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर आहे. अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यानं या महिलांनी स्वत:हूनच अर्ज मागे घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी २ कोटी ६३ लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील २ कोटी ३४ लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले. पण आता त्या पात्र अर्जांची छाननी होण्याची भीती अनेक महिलांना वाटू लागली आहे.
हे वाचलं का? – अपात्र बहिणींचे ‘लाड’ संपणार! ‘हे’ निकष पाळले नाहीत तर ७५०० रुपये परत घेणार
अपात्र ठरल्यास आतापर्यंत मिळालेली लाभाची रक्कम दंडासह वसूल करण्यात येईल, अशी भीती अनेक महिलांना वाटते. त्यामुळेच त्यांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. या संदर्भातले वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
दरम्यान, महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. ‘योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले पैसे परत घेण्याचा आमचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरलेल्या महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या महिला अपात्र ठरतील. त्यांना पुढील हफ्ते मिळणार नाहीत. अन्य लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पुढील हफ्ता मिळेल,’ अशी माहिती तटकरेंनी दिली.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


