वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

वैजापूर । Vaijapur

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर आज सकाळपासून शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. सकाळी ९ वाजेपासूनच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे कारण म्हणजे, बाजार समितीला शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीची आज डेडलाईन होती. मात्र, सकाळपासूनच बाजार समितीचे जबाबदार कर्मचारी, सभापती अथवा संचालक उपस्थित नव्हते. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालय समोरच ठिय्या दिला.

काय आहे प्रकरण?

४०६ शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची विक्री वैजापूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला केली होती. मात्र, व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. याची तक्रार शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केली. व्यापाऱ्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने बाजार समितीने गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक झाली. मात्र शेतकऱ्यांचे पैशाचं काय? यामुळे शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद पाडले.

हे वाचलं का? – नाशिकमध्ये मध्यरात्री थरार! लाखो रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई… Video समोर

आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकरी व बाजार समितीच्या संचालकांमध्ये मध्यस्थी करून बाजार समितीला ४० दिवसांची मुदत दिली होती. या काळात रक्कम दिली नाही, तर त्यांनी स्वतः पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. १० जानेवारी रोजी सकाळी पैसे मिळतील, असा शब्द शेतकऱ्यांना देण्यात आला होता.

शेतकऱ्यांना मुदतीनंतरही पूर्ण पैसे मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांना चेक देण्यात आले, परंतु बहुतेक जणांची देय रक्कम थकीत राहिली. यामुळे दुपारी १.३० वाजता शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सकाळी ९ वाजल्यापासून शेतकरी ठिय्या मांडून होते. मात्र, बाजार समितीचे सभापती दुपारी १.३० वाजता उपस्थित झाले. संतप्त शेतकऱ्यांनी टाळ्यांचा गजर करून त्यांचे स्वागत केले.

हे वाचलं का? – छगन भुजबळांचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना पत्र; विषय काय?

डॉक्टर दिनेश परदेशी यांनी सचिवांना झापलं

डॉक्टर दिनेश परदेशी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दूरध्वनीद्वारे पणन मंत्र्यांशी चर्चा देखील केली. यानंतर शेतकऱ्यांनी रात्री चेक वाटण्याचा प्रकार सांगितला तेव्हा परदेशी यांनी चेक कुठल्या आधारावर वाटले? शेतकऱ्यांची निवड कशी केली? याबाबत सचिवांना विचारणा केली. मात्र सचिवांनी बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार चेक वाटले असे उत्तर दिले. जर शेतकऱ्यांचे पैसे वाटायला पणन मंत्रालयाची परवानगी लागते तर तुम्ही चेक वाटलेच कसे वाटायचे तर सर्वांना समान वाटायचे असते इथे काय हुकूमशाही आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here