बिबट्याची झडप, शेतात ओढत नेले… लचके तोडले.. चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

वैजापूर । दिपक बरकसे

गेल्या काही वर्षांपासून बिबट्याकडून मानव जातीवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढू लागलंय. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना अधिक आहे.

नागरिकांकडून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील कविटखेडा येथे कापूस वेचण्यासाठी आलेल्या शेतमजुराच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या हल्ल्यात चिमूरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीच वातावरण पसरलं असून चिमूकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का? – …अन् लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात आरपार घुसल्या; नाशिकमधील थरकाप उडवणाऱ्या अपघाताच कारण समोर

कविटखेडा शिवारातील गट नंबर १३३ मध्ये गोरख काशिनाथ चव्हाण यांच्या शेतात ही हृदयद्रावक घटना घडली. महेश सिद्धार्थ आखाडे असे या मृत चिमुरड्याने नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश शेतात बसलेला असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला शेजारील ज्वारीच्या शेतात ओढत नेले.

आरडाओरड ऐकून शेजारील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी ज्वारीच्या शेतात उभ्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकरी बिबट्याला पळवून लावण्यासाठी शेतात ट्रॅक्टर फिरवू लागले. अखेर बिबट्याने मुलाला सोडून पळ काढले, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत महेशचा मृत्यू झाला होता.

हे वाचलं का? – नायलॉन मांजाने घेतला तरुणाचा बळी, मे महिन्यात होणार होते लग्न

या घटनेमुळे कविटखेडा आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यामुळे शेतकरी आणि रहिवासी भयभीत झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here