
गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेले दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून मुलीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गायब झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सतीश सालियन यांनी याचिकेत माजी मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. तसेच मुंबई पोलिसांवरही संशय व्यक्त केला आहे. 8 जून 2020 रोजी मालाड येथील दिशाच्या घरी झालेल्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते, असा दावा करण्यात आला आहे. दिशाच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी पोलिसांना अनेक फोन केले आणि साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. (Sushant Singh Rajput connection)
याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या (Disha Salian murder) झाल्याचा खळबळजनक आरोप आहे. दिशा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूत घातपात असून, यात आदित्य ठाकरेंची भूमिका संशयास्पद असल्याचे सतीश सालियन यांनी म्हटले आहे. या प्रकरणाच्या नव्या तपासाची मागणीही त्यांनी केली आहे. (Aditya Thackeray allegations)
हे वाचलं का? – दोस्त दोस्त ना रहा! मित्रानेच काढला मित्राचा काटा, धारदार शस्त्राने भोसकून खून
दिशा सालियन ही सेलिब्रिटी मॅनेजर होती आणि सुशांत सिंह राजपूतसह अनेक कलाकारांसोबत तिने काम केले होते. तिचा जन्म कर्नाटकातील उडुपी येथे झाला होता. मनोरंजन क्षेत्रात तिची ओळख होती आणि ती अनेक जाहिरात एजन्सींशी जोडली गेली होती. (Bollywood mystery)
8 जून 2020 रोजी दिशाचा मालाड येथील 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला याला आत्महत्या म्हटले गेले, पण अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. सुशांतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला, ज्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याची शंका उपस्थित झाली. (Disha Salian and Sushant Singh Rajput death link)
दिशा सुशांतची मॅनेजर होती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने रिया चक्रवर्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. रियाने एका मुलाखतीत सांगितले की, सुशांतमुळे तिची दिशाशी ओळख झाली होती. दिशा टीव्ही अभिनेता रोहन रॉयला डेट करत होती आणि दोघांचा साखरपुडाही झाला होता.
हे वाचलं का? – शिर्डी हादरली! पोटच्या पोरानेच बापाला संपवले, आकस्मिक मृत्यू भासवला पण…
सीबीआयने सुशांत प्रकरणाचा तपास केला, पण दिशाच्या मृत्यूबाबत संशय कायम आहे. सतीश सालियन यांनी हायकोर्टात नव्या तपासाची मागणी करताना अनेक सिद्धांत आणि आरोपांचा उल्लेख केला आहे. ठोस पुराव्याअभावी हे प्रकरण अजूनही गूढच आहे. (Aditya Thackeray party controversy)
दिशा आणि सुशांतच्या मृत्यूने मनोरंजन क्षेत्रात हादरे बसले. या प्रकरणातील नवे दावे आणि याचिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. सत्य समोर येण्यासाठी आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Disha Salian rape and murder case)
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


