अखेर दिल्लीत 'कमळ' फुललं...! २७ वर्षांनी दिल्लीत भाजपचा विजय

भाजपसाठी २०२५ या वर्षाची सुरुवात जोमात झाली आहे. २०२४ वर्षाची अखेर महाराष्ट्र विजयानं केलेल्या भाजपनं नव्या वर्षातल्या पहिल्याच निवडणुकीत देशाची राजधानी दिल्लीवर आपला झेंडा रोवला आहे. (BJP Delhi Election Win)

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये (Delhi Assembly Elections 2025) भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवत पक्षाची २७ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आणली. १९९८ पासून भाजपा दिल्लीत सत्तेपासून दूर राहिल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विजयासाठी भाजपानं कंबर कसली होती. ही निवडणूक पक्षानं प्रतिष्ठेची केली होती. (BJP vs AAP)

हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपला विजयाचा आत्मविश्नास पाहायला मिळाला (BJP Political Strategy). प्रचारातला हा आत्मविश्वास निकालातही दिसला. भाजपनं दिल्लीतल्या प्रचारात विकासाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता. दिल्लीकरांच्या मनात भाजपनं स्थान मिळवल्याचं पाहायला मिळालं.

मतमोजणीच्या पहिल्या क्षणापासून ते निकालापर्यंत भाजपनं निकालाच्या प्रत्येक टप्प्यावर वर्चस्व राखलं. ७० सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाने ४८ हून अधिक जागी विजय मिळवला आहे. तर आप पक्षाला २२ जागांवर समाधान मानावे लागले. (BJP Victory in Delhi)

हे वाचलं का? – नाशिकमध्ये भीषण अपघात! खासगी बस दरीत कोसळली, ७ जण ठार

दरम्यान आता भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, भाजपमध्ये अनेक नेते आहेत ज्यांच्या नावांची चर्चा भाजप हायकमांड मुख्यमंत्री पदासाठी करू शकते. (Delhi New CM)

तर दुसरीकडे मध्यप्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये भाजपने सर्वांना धक्का देत आऊट ऑफ द बॉक्स मुख्यमंत्र्यांची निवड केली होती. त्यामुळे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. (Delhi Government Formation)

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here