बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पहिला धक्का दिला आहे.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी माहिती दिली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तर येथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार असेही संकेत त्यांनी दिले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वादानंतर हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का? – वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात! मकोका अन् १४ दिवसांची कोठडी, प्रकरण तापणार?

दरम्यान, जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे. तसेच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.

काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बिड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण,माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बिड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्याचसोबत वाल्मिक कराड यांना मोक्का लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली होती. अनेक हिंस्त्र आंदोलनं कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती, त्यासंदर्भातील माहिती अजित पवार यांनी जाणून घेतली.

हे वाचलं का? – धक्कादायक! शरद पवारांच्या विश्वासू सहकार्याचं प्रयागराजमधील कुंभमेळ्यात निधन

या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली या भेटीत अजित पवार यांनी बिड जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले होते त्यामुळे आज धनंजय मुंडे परळी मधे आज काही भूमिका मांडणार आहेत का? हे पाहणं महत्त्वाच आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here