सरत्या वर्षात चांगला झालेला चांगला पाऊस आणि विक्रमी उत्पादनामुळे शेती क्षेत्रासाठी २०२५ वर्ष आशादायक ठरण्याची चिन्हे आहेत. पाच वर्षानंतर यंदा पुन्हा एकदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे.

अजूनही कांदा लागवड सुरु असून मकरसंक्रांतीपर्यंत ही लागवड सुरु राहणार आहे. कांद्या पाठोपाठ गव्हाची पेरणी झाली आहे. उसाची देखील विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षीसाठी परिसरात मुबलक कांदा व मुबलक ऊस राहणार असल्याने बोलले जाते.

दोन वर्षांपासून कपाशीला चांगला भाव मिळत असल्याने यावर्षी उसापेक्षा तालुक्यात कपाशीची विक्रमी लागवड झाली. कपाशी सहा ते साडे सहा हजार रुपये किंटलने विकावी लागली. वेचणीसाठी वेळेत मजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. तसेच कांद्याचे किरकोळ विक्रीचे दर शेवटच्या टप्प्यात ५० ते ६० रुपये किलोवर गेल्याने यावर्षी लाल कांद्याला सुगीचे दिवस आले आहे.

हे वाचलं का? – संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात?

त्यामुळे शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्यांची रोपे टाकली. जसे जसे कपाशीचे क्षेत्र रिकामे होऊ लागले तसेतसे या जमिनीची तातडीने मशागत करून कांद्याची लागवड सुरू झाली. काही ठिकाणी सरी पध्दतीने तर काही ठिकाणी वाफा पध्दतीने लागवड सुरु झाली. आज सर्वत्र शेतात कांदा लागवड सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वत्र कांदा लागवडीची झुंबड उडाली आहे.

यंदा शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात कांदा रोप टाकल्याने लागवडीसाठी रोपही उपलब्ध होत असल्याने लागवडीत भर पडली आहे. मेहनत, मजुरी, खते व किटकनाशके आर्दीसह कांद्याला एकरी साठ ते सत्तर हजारांचा खर्च येत आहे. पुढे काय भाव मिळेल? याची शास्वती नसताना देखील शेतकरी हे धाडस करतात. कांद्यापाठोपाठ गव्हाची पेरणीही चांगल्याप्रकारे झाली आहे.

गव्हाला देखील वर्षभर अडीच तिन हजारांचा भाव टिकून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी गव्हाला पसंती दिली असल्याने गहू लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ आहे. दोन दिवसां पासून थंडीचा जोर वाढला मात्र, काल पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊन थंडी गायब झाली आहे. याचा निश्चित परिणाम गहू पिकावर होण्याची भिती आहे. थंडी फेब्रुवारी अखेरपर्यंत टिकली तरच कांदा व गव्हाचे पीक हातात येण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का? – डीएपी खताबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना थेट होणार फायदा

यंदा ऊस पिकाची देखील मोठ्याप्रमाणात लागवड झाली असून अजूनही उसाच्या लागवडी सुरु आहेत. भुसार मालाला मजुराचा खर्च जास्त होतो व मजूर वेळेवर मिळत नाही. भावाची शास्वती नसते. त्यापेक्षा उसाचा भाव हा दरवर्षी जाहीर केला जातो व एकप्रकारे यामध्ये निश्चिती असल्याने यंदा पुन्हा मोठ्या प्रमाणात शेतकरी उसाकडे वळले आहेत.

ऊस तोडीची अडचण सोडली तर ऊस पिकात बाकीची अडचण येत नाही. यंदा पाऊस भरपूर झाल्याने धरणे भरली आहेत. त्यामुळे पाण्याची अडचण येणार नसल्याने उसाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. एकंदरित परिस्थिती पाहता भुसार पिकाला वैतागून शेतकरी पुन्हा ऊस पिकाकडे वळला आहे.

दरम्यान, नव्या वर्षात सरकारने शेतीच्या विविध क्षेत्रांसाठी अनेक योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निधीची तरतूदही केली आहे. पीएम-किसान, पीकविमा आणि इतर योजनांमध्ये बदलाचेही संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सरकारने पीएम-किसान योजना सुरू केली.

२०१८ मध्ये सुरू केलेल्या या योजनेमध्ये आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांना ३ लाख ४६ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. संसदीय समितीने पीएम-किसानमधून मिळणाऱ्या निधीत दुप्पट वाढ करण्याची सूचना केली आहे. तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी समावेशक पीकविमा योजना राबवावी, असेही सुचविले आहे.

हे वाचलं का? – शेतकरी कापूस, सोयाबीनच्या अनुदानाला मुकणार?

सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये शेतीसाठी नव्या ७ योजना जाहीर केल्या. या योजनांसाठी १३ हजार ९६६ कोटी रुपयांचा निधीही देऊ केला. या सर्व योजना २०२५ मध्ये लागू करण्यात येणार आहे. या योजना शेतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत राबविल्या जाणार आहेत. त्यात डिजिटल बदल, पीक विज्ञान, पशुधन आरोग्य आणि नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन आदी क्षेत्रांचा समावेश आहे.

पीकविम्यात बदल करून समावेशक करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय पंतप्रधान पीकविमा योजनेसारख्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इतर योजनांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहे. पंतप्रधान पीकविमा योजना राबवताना योग्य त्या सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२५ मध्ये हे घडू शकते. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी २०२५ वर्ष आशादायक ठरण्याची चिन्हे आहेत.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here