वैजापूर तालुक्यातील कोल्ही घाटात शनिवारी (ता. १८) सायंकाळी भरधाव पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत ३६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. किरण नवनाथ गिरे (वय 36, रा. हिंगोनी कांगोनी) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, किरण गिरे हे नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने प्रवास करत होते. कोल्ही शिवारात भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली.

हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी किरण गिरे यांना तपासून मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची शिऊर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here