
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात सोमवारी सायंकाळी 4 ते 5:30 या वेळेत वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला.
पोलिस निरीक्षक ताईतवाले यांनी सांगितले की, 12 जून रोजी घडलेल्या एका घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जाळपोळ करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. “कायद्याचे राज्य आहे आणि ते अबाधित राहील,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
हे वाचलं का? – वैजापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; घरावरील पत्रे उडाल्याने कुटुंब उघड्यावर
खंडाळा गावात शांतता कायम राखण्याचे आवाहन ताईतवाले यांनी केले. कोणत्याही प्रकारची गैरकृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत गावकऱ्यांना शांततेचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या या पावलांमुळे गावात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


