
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर (Vaijapur news) तालुक्यातील डागपिंपळगाव येथे शुक्रवारी एक हृदयद्रावक घटना घडली. विजेचा धक्का लागून एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू (Electric shock death) झाला. ईशा सचिन पवार (वय २१ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ईशा पवार या शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरी काही काम करत असताना (Dagpimpalgaon incident) त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ही घटना घडल्यानंतर घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी तातडीने त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दुपारी सुमारे १२ वाजता दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. (Headlines Marathi)
हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?
घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व भालेराव यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे वीरगाव पोलीस ठाण्यात घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. (Accidental death due to electricity)
दरम्यान, या दुर्घटनेचा अधिक तपास वीरगाव पोलीस करत असून नेमकी परिस्थिती काय होती याचा शोध घेतला जात आहे. ईशाच्या आकस्मिक निधनामुळे डागपिंपळगाव गावात शोककळा पसरली आहे. तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील (Tragic news Maharashtra) नागरिकांनी त्यांच्या दुःखात सहानुभूती व्यक्त केली आहे. (Maharashtra local news)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


