खंडाळ्यात जमावाचा उन्माद! दुकानांची तोडफोड करून जाळपोळ, 37 जणांवर गुन्हा दाखल

वैजापूर | दीपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात 12 जून रोजी सायंकाळी जमावाने चार दुकानांची तोडफोड करून जाळपोळ केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 37 जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Khandala mob attack)

खंडाळा येथील बोरसर रोडवर राहणारे नवनाथ लक्ष्मण नन्नावरे (वय 35) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मते, 12 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास 30 ते 35 जणांचा जमाव लोखंडी गज आणि काठ्या घेऊन त्यांच्या विश्वकर्मा फर्निचर दुकानासमोर आला. या जमावाने दुकानाचे शटर तोडून आतमधील फर्निचर आणि साहित्याची नासधूस केली. यानंतर जमावाने शेजारील अमोल ज्ञानेश्वर जाधव यांच्या सलून दुकानाचे शटर तोडून तिथेही तोडफोड केली आणि सर्व साहित्याची हानी केली. (Vaijapur vandalism)

घर आणि दुकानांना आग

या घटनेत जमावाने नन्नावरे यांच्या राहत्या घरात प्रवेश करून टीव्ही फोडला आणि घराच्या दरवाज्यांसह दुकानातील फर्निचरवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. “इन सबको जिंदा जला डांलेंगे,” अशी धमकी देत जमावाने गोंधळ घातला. नन्नावरे यांनी आपली पत्नी आणि मुलांना मागच्या दरवाजाने सुरक्षित बाहेर काढले. याचवेळी, जमावाने नन्नावरे यांच्या दुकानासमोरील विजय नारायण त्रिभुवन यांच्या लक्ष्मी जलधारा पाण्याच्या जारच्या दुकानाचे शटर तोडून पाण्याच्या टाक्या आणि फिल्टर मशीन फोडली. (mob violence)

हे वाचलं का? – हनीमूनचं रूपांतर हत्याकांडात! राजा रघुवंशी हत्या प्रकरणी ट्विस्ट, नव्या नवरीनेच दिली पतीची सुपारी

आणखी एका दुकानाची जाळपोळ

नन्नावरे यांना नंतर समजले की, जमावाने त्यांचे दुकान आणि घर जाळण्यापूर्वी गावातील सागर खरात यांच्या गळ्यात चाकू ठेवून धमकावले होते. तसेच, गौरव राजेंद्र अनर्थे यांच्या साई श्रद्धा नावाच्या सलून दुकानाची तोडफोड करून त्यांची मोटरसायकल आणि दुकान जाळून टाकले.

ही घटना घडल्यानंतर नन्नावरे आणि त्यांचे कुटुंबीय घाबरून आंदरसुल येथे त्यांच्या बहिणीकडे गेले. सोमवारी ते वैजापूर पोलिस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी 37 संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये सलमान सलीम खान, कलीम कालु शहा, जमील अकील शेख, अरबाज शेख, ऐजाज शहा, आसीफ मोहम्मद शेख, फिरोज कुरेशी, शकुर सलीम कुरेशी, अशपाक शेख, जाफर शेख, नासीर शेख, अनस ईमान शेख, आरमान पठाण, कामरान जमीर पठाण, वसीम पठाण, वसीम आब्बास शेख, राजेंक बिल्डर यांच्यासह इतरांचा समावेश आहे. (Headlines Marathi)

आमदार केनेकर यांची भेट

या प्रकरणानंतर आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांनी सोमवारी वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना एकतर्फी कारवाई न करण्याचे आणि जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच, घाबरलेल्या फिर्यादींना धीर देत, “हे कायद्याचे राज्य आहे, इथे अराजकतेला थारा नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन दिले.

हे वाचलं का? – मागील भांडणाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला; बंदुकीचा धाक दाखवत ७ तोळे सोने, २ लाख लुटले

गावात तणावाचे वातावरण

या घटनेमुळे खंडाळा गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून, तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमुळे गावातील शांतता भंग होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी संशयितांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. वैजापूर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नेते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Mob Violence in Khandala: Shops Vandalized, Houses Torched, FIR Against 37 People

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here