प्रतीक्षा संपली! आज बारावीचा निकाल... कधी, कुठे अन् कसा पाहाल? | Photo - Canva

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा 2025 चा निकाल अखेर जाहीर होणार आहे. मंडळाने यासंबंधी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, (HSC result date and time) यंदाचा HSC (12वी) निकाल सोमवार, 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. (Maharashtra HSC Result 2025)

निकालाची घोषणा करण्याआधी सकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत पार पडल्या. राज्यभरातून सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. (12th result 2025 Maharashtra board)

निकाल पाहण्यासाठी उपलब्ध संकेतस्थळे (MSBSHSE HSC result)

निकाल कसा पाहता येईल? (how to check HSC result 2025)

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या किंवा अन्य पर्यायी संकेतस्थळांवर जे वरती दिलेले आहेत.
  • वेबसाइटवर HSC Result 2025 लिंकवर क्लिक करा.
  • परीक्षेचा क्रमांक, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  • माहिती भरल्यानंतर “Submit” बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. त्याची प्रिंट घ्या किंवा PDF स्वरूपात सेव्ह करा.

वेबसाइट धीम्या गतीने चालल्यास काय करावे? (Maharashtra board 12th marksheet download)

निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक असल्यामुळे अनेक वेळा ती स्लो होते किंवा डाऊन होते. अशावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलमधून “MHSCC” असा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवावा. यानंतर विद्यार्थ्यांना SMS द्वारे त्यांचा निकाल मिळेल.

ग्रेडिंग सिस्टम कशी असेल? (HSC grading system 2025)

  • 75 टक्के आणि त्यापुढे – Distinction
  • 60 टक्के आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)
  • 45 टक्के to 59 टक्के – द्वितीय श्रेणी (Second Class)
  • 35 टक्के to 44 टक्के – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)
  • 35 टक्के पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)

गुण पडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज प्रक्रिया (12th revaluation process 2025)

निकाल जाहीर झाल्यानंतर 6 मे ते 20 मे 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या प्रती मिळवणे किंवा पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात येईल.

पुरवणी परीक्षा आणि त्याचा निकाल

ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल 15 मे रोजी अपेक्षित

बारावीनंतर आता राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या. यामध्ये तब्बल 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 8 लाख मुले, 7 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल 15 मे 2025 रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here