“मेरी नजरसे तुम देखो तो गद्दार..”, कुणाल कामराने उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली; संजय राऊतांकडून ट्विट

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) आपल्या एका शो दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) विडंबनात्मक गाणं (satirical song) सादर केलं.

या गाण्यात त्यांनी थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नसलं तरी त्यातील संदर्भ स्पष्टपणे शिंदेंवर असल्याचं समजतं. या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं असून शिवसेनेने (Shiv Sena) संताप व्यक्त केला आहे. कुणाल कामराच्या या गाण्यावर शिवसेना आक्रमक झाली असून, खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये (Unicontinental Hotel) शिवसैनिकांनी तोडफोड केली. या हॉटेलमध्येच कामराचा शो झाला होता. (Maharashtra politics)

शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर कॉमेडियन कुणाल कामराविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याचवेळी ठाण्याबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती.

हे वाचलं का? – दिशा सालियन मृत्यू प्रकरण; सुशांत सिंह राजपूतशी संबंध ते आदित्य ठाकरेंवरील आरोप

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी इशारा दिला की, “रात्री १२ वाजेपर्यंत कुणाल कामराने माफी मागितली नाही, तर संपूर्ण शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.” त्यामुळे याप्रकरणी पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. (political controversy)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र या प्रकरणात वेगळा पवित्रा घेतला आहे. त्यांनी कुणाल कामराचा हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत “कुणाल की कमाल! जय महाराष्ट्र!” असं म्हणत त्याला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यामुळे या प्रकरणावरून आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुणाल कामरा काय म्हणतो?

“महाराष्ट्र इलेक्शन में इन्होने जो किया है बोलना पडेगा. यहांपे पहले इन्होने क्या किया? शिवसेना बीजेपीसे बाहर आ गयी. उसके बाद शिवसेना शिवसेनासे बाहर आ गयी, एनसीपी एनसीपी बाहर आ गयी. एक व्होटर को नौ बटन दे दिये. सब कन्फ्युज हो गये. चालू एक जन ने किया था. वो मुंबईमें एक बहोत बढिया डिस्ट्रिक्ट है थाने. वहाँ से आते है..” असं कुणाल कामरा म्हणतो आणि गाणं सुरु करतो. या गाण्याला ‘भोली सी सुरत’ या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील गाण्याची चाल आहे. या चालीवर तो म्हणतो ‘मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये’. हा कुणाल कामराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का? – दोस्त दोस्त ना रहा! मित्रानेच काढला मित्राचा काटा, धारदार शस्त्राने भोसकून खून

कुणाल कामराने आपल्या गाण्यात थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलेलं नसले तरी, त्यात दिलेले संदर्भ शिंदेंवरच आहेत, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंनी २०२२ मध्ये शिवसेनेतून बंड करत चाळीस आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३७ जागा मिळाल्या, आणि शिंदे आता उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

या गाण्यामुळे कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेने कठोर भूमिका घेतली असून, त्याला माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आल्याने त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (Kunal Kamra Eknath Shinde controversy)

हे वाचलं का? – शिर्डी हादरली! पोटच्या पोरानेच बापाला संपवले, आकस्मिक मृत्यू भासवला पण…

या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, शिवसेनेची पुढील भूमिका काय असेल याकडे लक्ष लागलं आहे. तसेच कुणाल कामरा याची पुढील प्रतिक्रिया काय असेल हेही महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळात या प्रकरणावर आणखी चर्चा रंगण्याची शक्यता आहे. (Maharashtra political news)

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here