भाऊसाहेब चिकटगावकर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (१८) दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर चिकटगावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या आगमनामुळे वैजापूरमध्ये ठाकरे गट मजबूत झाला होता. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी न देता भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे नाराज झालेले चिकटगावकर यांनी निवडणूक लढवली नाही आणि थेट शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना पाठिंबा जाहीर केला.

हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना

त्यावेळी त्यांनी स्वतः शिंदे गटात प्रवेश न करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींनंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. आज दुपारी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here