
वैजापूर । दिपक बरकसे
खरज शिवारात झालेल्या दुर्दैवी अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. अर्जुन पुंजाराम बघढाने (वय ४५, रा. खरज) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अर्जुन बघढाने हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना खरज शिवारात त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या कारशी जोरदार धडक झाली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात खरज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद शिऊर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


