अरे बापरे! चक्क इनोव्हा गाडीतून वासरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे इनोव्हा गाडीतून 20 वासरांची अमानुष वाहतूक करताना दोघांना पकडण्यात आले. वीरगाव पोलिसांनी वासरू आणि वाहन जप्त करून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस हवालदार मनोज कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. श्रीरामपूर-वैजापूर रोडवरील लाडगाव शिवारात पांढऱ्या इनोव्हा (MH 15 BS 7770) मध्ये गोवंश वासरू कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

याप्रकरणी ममदापूर, ता. राहता येथील चालक हुसेन इब्राहिम तांबोळी आणि सानी साबेर शेख या दोघांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कठोरातील कठोर कारवाई करत आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here