
वैजापूर । दिपक बरकसे
महालगाव शिवारातील साखर कारखान्याजवळ गुरुवारी (२० फेब्रुवारी) रात्री दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
मनीष अनिरुद्ध जैस्वाल (२५, रा. अयोध्या नगर) याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. सोनू परशन जैस्वाल (२५), मन्सूर बिस्मिल्ला अली (२५) आणि अमजद अब्दुल्ला अन्सारी (२१), तिघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…
प्राथमिक माहितीनुसार, मनीष आणि त्याचे तिन्ही मित्र दुचाकीने महालगावकडून वैजापूरकडे येत होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर दुचाकी ट्रॅक्टरखाली गेली, त्यामुळे चौघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री १०.३० वाजता डॉक्टरांनी मनीषला मृत घोषित केले. उर्वरित तिघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



