दुचाकी विद्युत पोलवर धडकून अपघात; तरुणाचा मृत्यू

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर (Vaijapur accident) तालुक्यातील धोंदलगाव येथे दुचाकी अपघातात (Bike accident news) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश पंजाब वाघ (वय २२, रा. धोंदलगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ही दुर्घटना अंबिकानगर परिसरात घडली. ऋषिकेश वाघ आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. (Dhondalgaon bike crash)

हे वाचलं का? – समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात: दोन ठार, पाच जखमी

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (two-wheeler accidents) ऋषिकेश वाघ यांच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. (latest accident news)

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here