माजी विद्यार्थ्यांची ३२ वर्षांनी पुन्हा भरली शाळा!

हृदयाच्या नाजुक कप्प्यात साठवलेल्या आठवणी तब्बल ३२ वर्षानंतर त्याच ठिकाणी त्याच गड्यांसोबत त्याच वातावरणात उलगडल्या गेल्यातर भावना शब्दांच्याही पलिकडच्या ठरतात असाच काहीसा अनुभव युवावर्गाला आला. आठवणीची स्पंदने तशीच साठवत निरोप घेताना अनेकांना गहीवरून आले. ‘मित्र मिलाप’ हा आगळा वेगळा उपक्रम तालुक्यातील खंडाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडला.

१९९३-९४ बॅचचे मित्र मैत्रीण तब्बल ३२ वर्षांनी रविवारी (ता.२६) गेट टु गेदर कार्यक्रमच्या माध्यमातून एकत्र आले. इतक्या वर्षांनी सर्वजण एकत्र आल्यावर एक भावनिक वातावरणाचा सोहळा ठरला. खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळा येथे तत्कालीन शिक्षक, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्व शिक्षक यांची भेट झाल्याने या विधार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

बालपण सगळे डोळ्या समोर जसेचा तसे उभे राहिले. जुन्या आठवणींना उजाळा देत जे सध्या हयात नाही त्यांना श्रदांजली वाहण्यात आली.औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विलास त्रिभुवन, अनिल कर्डिले, मोबीन खान, एकनाथ पवार, यांनी मनोगत व्यक्त करताना भूतकाळातील आठवणी ताज्या केल्या.

उपस्थित मित्रांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते. सेल्फी काढत होते.त्यानंतर सगळ्यानी धमाल मस्ती करत हुरडा पार्टी, दाळबट्टी व चमचमीत जेवनावर ताव मारले. या कार्यक्रमाला बाबासाहेब सुदाम, नवनाथ गाडेकर, दिनकर पवार, पूंजाहारी मोरे, राजू बागूल, संतोष झाल्टे, कडू गरूड, कांतीलाल वाघचौरे, दादासाहेब घायवट, भिकन शेख, मिलींद पवार, शिल्पा डवाळकर- कुलकर्णी, वंदना बागूल-सातदिवे, संगिता बागूल- भुजंग आदिंची उपस्थिती होती.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here