वैजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आयोजित मुख्य शासकिय कार्यक्रमात उपविभागिय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला.

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर शहरात विविध कार्यक्रमांनी भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, भारतमातेचे पूजन व निवडणूकीत उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा निवडणूक अधिकारी व तालुका स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या प्रशस्ती पत्रांचे वाटप, काही ठिकाणी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छासाठी उभारलेले स्टाल्स अशा विविध उपक्रमांनी शहरातील विविध कार्यालय व प्रतिष्ठाण येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साह व आनंदात साजरा झाला.

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर झाला. उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या हस्ते व तहसिलदार सुनील सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सकाळी सव्वा नऊ वाजता झाले. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम व प्रमाण पत्र वितरण झाले.तहसीलदार सुनील सावंत, गट विकास अधिकारी डॉ.श्रीकृष्ण वेणीकर भगत, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर,प्रशालेचे मुख्याध्यापक एस. के.पगार, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, नायब तहसिलदार, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच जे.पी.सूर्यवंशी, के.ए.वाघ,अशोक पवार आप्पा खंडाळकर, पारस पेटारे, बाबासाहेब जगताप यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नरवडे उपस्थित होते.

शहरात तहसील कार्यालयात तहसीलदार सुनील सावंत,नगर पालिकेत मुख्याधिकारी‌ संगीता नांदूरकर, हुतात्मा स्मारकात वीर पत्नी लक्ष्मीबाई जयराम भोसले,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी, साबेरखान, दशरथ बनकर, उल्हास ठोंबरे, सखाहरी बर्डे,डॉ,निलेश भाटिया आदींची उपस्थिती होती.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here