बेलगाव शिवारात अज्ञात चोरट्यांकडून २३ हजार रुपयाचा ऐवज लंपास

वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे दोन ग्रॅमचे मणी आणि 17 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 23 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना 21 जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर जगदाळे व त्यांचे कुटुंबीय रात्री 10 वाजता जेवण करून झोपी गेले होते. पहाटे त्यांच्या आत्यांना कपाट उघडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्या जाग्या झाल्या आणि त्यांनी इतर कुटुंबीयांना उठवले. घराचा दरवाजा उघडा दिसला आणि कपाट उघडे आढळले. घराची तपासणी केली असता सोन्याचे मणी आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

हे वाचलं का? – नाशिक हादरलं! अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत हत्या

रामेश्वर जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी साडेपाच वाजता वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here