
तुर्कस्तानच्या एका स्की रिसॉर्टमधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत किमान ६६ लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर अनेक नागरिक यात जखमी झाले आहे. आगीला घाबरलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या टाकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, वायव्य तुर्कीत असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कार्टालकाया स्की रिसॉर्टमध्ये ही घटना घडली. आग लागली तेव्हा रिसॉर्टमध्ये २३४ पाहुणे वास्तव्यास होते. स्थानिक वेळेनुसार ३ च्या सुमारास ही आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आगीची दाहकता पाहायला मिळते.
स्की रिसॉर्टला अशा वेळी आग लागली आहे जेव्हा तेथे सर्वाधिक गर्दी असते. तुर्कस्तानात जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील शालेय सुट्ट्या असतात. या काळात इस्तंबूल आणि अंकारा येथून अनेक लोक बोलू पर्वतावर स्कीइंगसाठी येतात.
हे वाचलं का? – नाशिक हादरलं! अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत हत्या
आगीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र बोलू चे गर्व्हनर अबदुलअझिझ आयदिन म्हणाले की प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये ही आग लागली आणि तिथून ती हॉटेलच्या वरच्या मजल्यांमध्ये पसरली. आयदिन म्हणाले की त्या परिसरातील थंड हवामान यामुळे हॉटेलपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला.
तुर्कीच्या टीव्ही चॅनेल्सनी प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये हॉटेलच्या वरच्या मजल्यांवर आग भडकलेली दिसत होती. काही फुटेजमध्ये लोकांनी बेडशीट्स बांधून आगेतून पळण्याचा प्रयत्न करताना दिसले.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


