
राज्यातील पालकमंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन ठिकाणी या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहेत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांची नाशिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड करण्यात आली होती. मात्र रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय रविवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. याच दरम्यान आता मोठी अपडेट समोर आली असून २६ जानेवारीला रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत.
याबात शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, (दि. १९) रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या राष्ट्रध्वजारोहण करतील, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट
रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली.त्यानंतर या दोन्ही पदांना स्थगिती देण्यात आली.
कोणते मंत्री कोठे ध्वजारोहण करतील?
- ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
- पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार
- नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
- अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
- वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ
- सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
- नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन
- पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
- जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
- यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
- मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा
- मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार
- रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत
- धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
- जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
- नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे
- चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके
- सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई
- बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
- रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे
- लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
- नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
- सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे
- हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
- भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे
- छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
- धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
- बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
- सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे
- अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
- गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
- कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
- गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
- वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर
- परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
- अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


