प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार?

२६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पाडला जाणार आहे. राज्यभरात एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यामुळे सकाळी ८.३० ते १० या दरम्यान अन्य कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित केला जाऊ नये असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

मुंबईतील मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. तर विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री तसेच राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

कोणते मंत्री कोठे ध्वजारोहण करतील?

  • ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
  • पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार
  • नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
  • वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ
  • सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
  • नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन
  • पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
  • जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
  • यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
  • मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा
  • मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार
  • रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत
  • धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
  • जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
  • नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे
  • चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके
  • सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई
  • बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
  • रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे
  • लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
  • नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
  • सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे
  • हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
  • भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे
  • छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
  • धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
  • बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
  • सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे
  • अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
  • गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
  • कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
  • गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
  • वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर
  • परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
  • अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक

ध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री अनुपस्थित असल्यास विभागीय मुख्यालयातील आयुक्त, जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. प्रांत अधिकारी जिल्हा उपविभागीय तर तहसीलदार तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी अध्यक्षपद स्विकारतील. प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारती, किल्ले, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत असेही राजशिष्टाचार विभागाने कळवले आहे.

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ (१० आणि ११ जिओ ६C ३०), युनायटेड किंगडमच्या संसदेचा एक कायदा, ब्रिटिश कॉमनवेल्थ दोन नवीन स्वतंत्र अधिराज्यांमध्ये विभागले गेले. मात्र, स्वातंत्र्यानंतरही देशाला कायमस्वरूपी राज्यघटना नव्हती. त्याचे कायदे सुधारित गव्हर्नमेंट ऑफ कॉलोनियल इंडिया ऍक्ट १९३५ वर आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी कायमस्वरूपी राज्यघटना तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ बी आर आंबेडकर होते.

समितीने संविधानाचा मसुदा तयार केला, जो ४ नोव्हेंबर १९४७ रोजी संविधान सभेला सादर करण्यात आला. विधानसभेने २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांच्या १६६ दिवसांच्या सार्वजनिक अधिवेशनात संविधानाचे वाचन केले. या सभेच्या ३०८ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी दस्तऐवजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर (एक हिंदी आणि एक इंग्रजीत) विचारविनिमय आणि काही बदलांनंतर स्वाक्षरी केली. दोन दिवसांनंतर, म्हणजेच ६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही लिखित राज्यघटना लागू झाली. त्या दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय संघाचे अध्यक्ष म्हणून पहिला कार्यकाळ सुरू केला.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here