उकरंजगाव फाटा येथे दुकान फोडले, ४२ हजाराचा ऐवज लंपास

अज्ञात चोरट्याने दुकानाचा मागील पत्रा उचकटत दुकानातून झेरॉक्स मशीन, व्हिडिओ कॅमेरा व अन्य साहित्य असा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील करंजगाव फाटा येथे १४ जानेवारी रात्री नऊ ते १५ जानेवारी सकाळी ९ वाजे दरम्यान घडली. या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का? – नायलॉन मांजाने घेतला तरुणाचा बळी, मे महिन्यात होणार होते लग्न

फिर्यादी दादासाहेब उत्तमराव मगर (वय ४२ , राहणार करंजगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे करंजगाव फाटा येथे दुकान आहे. १४ जानेवारी रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. १५ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या मुलाने फोन करून दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. दुकानावर जाऊन पाहणी केली असता, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशीन, व्हिडिओ कॅमेरा, डीटीएच सेटअप बॉक्स व अन्य साहित्य असा ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

हे वाचलं का? – …अन् लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात आरपार घुसल्या; नाशिकमधील थरकाप उडवणाऱ्या अपघाताच कारण समोर

तसेच दुकानाच्या मागील पत्रा वाकवून चोरट्याने प्रवेश केल्याचे समोर झाले. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here