
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळील गोठेघर येथे पहाटे तीनच्या सुमारास विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक, आणि खासगी बससह पाच वाहने एकमेकांना धडकली. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलं का? – नायलॉन मांजाने घेतला तरुणाचा बळी, मे महिन्यात होणार होते लग्न
पहाटेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावर महामार्गावर एक मालवाहतूक ट्रक रस्त्यावर अचानक थांबला, ज्यामुळे मागून येणाऱ्या खासगी बसने ट्रकला धडक दिली. त्यानंतर या दोन्ही वाहनांना मागून येणाऱ्या आणखी तीन गाड्या धडकल्या. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अपघातातील अडथळा दूर करण्यासाठी क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला काढण्यात आली आहेत. अपघात इतका भीषण होता की यात अपघातग्रस्त वाहनांचा अक्षरशः चक्कनाचुर झाला आहे. बसच्या काचा तुटल्या आहेत.या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा


