मुख्याध्यापकाचं धक्कादायक कृत्य! १०० विद्यार्थिनींना शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेजरवर घरी पाठवलं

एका शाळेमध्ये तब्बल १०० हून अधिक विद्यार्थिनींना शर्ट काढायला लावल्याचा तसेच त्यांना फक्त ब्लेजरवर घरी पाठवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. झारखंडमधील धनबाद येथे एका प्रतिष्ठित खासगी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे.

इयत्ता दहावीच्या मुलींनी ‘पेन डे’ निमित्त एकमेकींच्या शर्टवर संदेश लिहिला होता. मुख्याध्यापकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी १०० हून अधिक विद्यार्थिनींना शर्ट उतरविण्याची शिक्षा दिली. मुलींनी सदर कृत्याबाबत माफीही मागितली होती. मात्र त्याना विनाशर्ट फक्त ब्लेझरवर घरी जाण्यास भाग पाडण्यात आले. मुली विनाशर्ट फक्त ब्लेझरवर घरी आल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांना धक्काच बसला.

हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह

दरम्यान, याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे. अनेक पालकांनी थेट उपायुक्त कार्यालयात धडक घेत शाळेच्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदार रागिनी सिंह यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित घटना दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद

शाळा प्रशासनाने मुख्याध्यापकावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. चौकशी समिती स्थापन केली आहे, जे काही निष्पन्न होईल त्यावर कडक कारवाई करू. गरज पडल्यास एफआयआरही नोंदवला जाईल, असे जिल्हाधिकारी माधवी मिश्रा यांनी म्हटलं आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here