
अहिल्यानगर । Ahilyanagar
राज्यात सध्या कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये गारठा वाढला आहे. काही ठिकाणी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही थंडीचे तीव्रतेने पाऊल ठेवले असून, तापमान ८ अंशांच्या खाली घसरले आहे. ग्रामीण भागातही थंडीचा प्रचंड कडाका अनुभवायला मिळत आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शाळांमध्येही मुलांची उपस्थिती कमी झाली आहे, आणि थंडीच्या प्रभावामुळे शालेय कामकाजावरही परिणाम होत आहे. नागरिकांनी गरम कपडे व इतर आवश्यक साहित्य वापरून तसेच उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत.


