
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवून सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली विश्वासघातकी वृत्ती दाखवत केवळ तीन तासांतच युद्धविरामाचे उल्लंघन (Pakistan ceasefire violation) करत भारतावर भ्याड हल्ला केला आहे. यामुळे सीमेवरील तणाव पुन्हा उफाळला असून, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या कुरापतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानने भारताशी केलेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन करत जम्मू येथील सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. हा प्रकार युद्धविराम जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन तासात घडला. पाकिस्तानकडून दुसऱ्या बाजूने अचानक गोळीबार सुरू झाला, मात्र सीमा सुरक्षा दल (BSF) सज्ज असल्याने तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले. (Jammu firing news)
दरम्यान या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत एक ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे. “भारत आणि पाकिस्तानच्या शस्त्रसंधीचे काय झाले? श्रीनगरमध्ये काही स्फोटांचा आवाज येत आहे. याला शस्त्रसंधी म्हणत नाहीत.” असे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
भारतीय जवानांनी ठोस आणि प्रभावी कारवाई करत पाकिस्तानच्या गोळीबाराचा योग्य प्रतिकार केला. दरम्यान, श्रीनगरमध्ये देखील ७ ते ८ जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या स्फोटांचे स्वरूप आणि कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. श्रीनगरसारख्या संवेदनशील भागात अशा स्फोटांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Srinagar explosions today)
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५.०० वाजता युद्धविराम लागू करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी ८ वाजता पाकिस्तानने गोळीबार सुरू करून युद्धविराम तोडला. (ceasefire broken Pakistan) या कृतीमुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होण्याची शक्यता आहे. भारत शांतता राखण्याच्या भूमिकेवर ठाम असूनही, पाकिस्तान सातत्याने सीमेवर अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. BSF व भारतीय लष्कराने या भ्याड हल्ल्याला तत्काळ आणि ठोस प्रत्युत्तर दिलं. सीमेवर सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळकट करण्यात आलं आहे. सर्व ठिकाणी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून सीमा भागात गस्त वाढवण्यात आली आहे. (India Pakistan border tension)
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं ही काही नवीन बाब राहिलेली नाही. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर गोळीबार किंवा घुसखोरीचे प्रयत्न होतच आले आहेत. युद्धविरामाची घोषणा म्हणजे एक औपचारिकता वाटावी, अशी पाकिस्तानची वर्तणूक दिसून येत आहे. भारताने कायमच शांतता राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, देशाच्या सीमांवर किंवा नागरिकांच्या सुरक्षेवर कोणताही धोका निर्माण झाला तर भारत योग्य ते उत्तर देतो आणि देत राहील, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. (India-Pakistan conflict update)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



