
भारतीय लष्कराने मध्यरात्री एक अत्यंत यशस्वी आणि नियोजनबद्ध कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ला चढवला. “ऑपरेशन सिंदूर” (Operation Sindoor) या मोहिमेमध्ये अवघ्या २३ मिनिटांत नऊ ठिकाणांवर अचूक हल्ले करून भारतीय वायूदलाने अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. (Operation Sindoor airstrikes)
ही कारवाई ६ मे रोजी रात्री १:०५ वाजता सुरू झाली आणि केवळ १:३० वाजता पूर्ण झाली. भारताच्या वायूदलाने या हल्ल्यासाठी राफेल लढाऊ विमाने आणि स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर केला. ही क्षेपणास्त्रं ५०० किमी अंतरावर असलेल्या लक्ष्यांवरही अचूक मार करू शकतात. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला भेदून, कोणताही लष्करी किंवा नागरी ठिकाण न उद्दिष्ट करत भारताने केवळ दहशतवादी केंद्रांवर अचूक प्रहार केला. (India Pakistan airstrike 2025)
भारतीय लष्करानं गाजवलेल्या पराक्रमाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. लक्ष्य किती अचूक टिपलं आहे हे या व्हिडिओंतून दिसतं. भारतीय लष्कराने हे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्यात सर्व ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे दिसते. तसेच भारताने हवाई हल्ल्यात वापरलेल्या मिसाइल आहेत. काही व्हिडिओंमध्ये तर स्फोटांचे आवाज येत आहेत. हल्ला झालेल्या ठिकाणी स्थानिकांचा आरडाओरडा ऐकू येत आहे. हल्ल्यानंतरची अवस्था बघून तो किती तीव्र आहे, याचा अंदाज येत आहे. (Indian Army Operation Sindoor)
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (Terror camps destroyed in Pakistan)
- बहावलपूर – जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय
- मुरीदके – लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
- सवाई – लश्कर-ए-तैयबाचा अड्डा
- गुलपूर – ८० दहशतवादी उपस्थित असलेला तळ
- बिलाल – जैशचं हवाई तळ
- कोटली – ५० अतिरेकी उपस्थित
- बरनाला – सीमारेषेपासून फक्त १० किमी अंतरावर
- सरजाल – जैशचा अड्डा
- महमूना – हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा
- खालिद मोहम्मद आलम – लष्करचा वरिष्ठ कमांडर
- कारी मोहम्मद इकबाल – कोटलीमधील दहशतवादी प्रशिक्षण प्रमुख
- रऊफ असगर – मसूद अझहरचा भाऊ, गंभीर जखमी
- रऊफ असगरची पत्नी आणि मुलगा ठार
- मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू
- लष्करचे अन्य दहशतवादी वकास, हसन, अब्दुल मलिक आणि मुदस्सिर ठार
ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये
- पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला चकवा देत हल्ला
- कोणत्याही नागरी किंवा पाक लष्करी ठिकाणाला इजा नाही
- लक्ष्य केवळ दहशतवादी केंद्रांवर
- ९ ठिकाणी अचूक माहितीच्या आधारे हल्ले
- पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील अड्ड्यांचा समावेश
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेतली. या वेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या महिला अधिकाऱ्यांनी मोहिमेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. त्यात निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली.कर्नल कुरेशी यांनी यावेळी हवाई हल्ल्याचे फोटो व व्हिडिओही सादर केले. यामध्ये स्फोटांचे आवाज, लक्ष्य उद्ध्वस्त होतानाचे दृश्य आणि हल्ल्यानंतरचा आरडाओरडा स्पष्ट दिसतो. भारतीय लष्कराच्या या मोहिमेने दहशतवाद्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण केली आहे. (Rafale airstrike Pakistan)
स्काल्प क्षेपणास्त्रांचे निर्णायक योगदान (Indian military strike on PoK)
- स्काल्प क्षेपणास्त्र ५०० किमी अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करू शकते
- याचा वेग १००० किमी/तास आहे
- शत्रूच्या रडारला टाळण्याची खास क्षमता
- राफेल विमानांनी ही क्षेपणास्त्रं वापरून अचूक मार केला
पाकिस्ताननेही अप्रत्यक्षरित्या दहशतवादी तळांवर हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. मात्र, भारताने कोणत्याही लष्करी किंवा नागरी ठिकाणाला लक्ष्य न केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या कारवाईला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. भारताने संयम आणि अचूक नियोजनाच्या आधारे हे हल्ले केले असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. (Skalp missile used by India)
मसूद अझहर, जो २६/११ मुंबई हल्ला, २००१ संसद हल्ला, उरी हल्ला आणि पठाणकोट हल्ला यामागे होता, याच्या संघटनेवर भारताने थेट कारवाई केली. या हल्ल्यामुळे जैश-ए-मोहम्मदच्या कमकुवत होत चाललेल्या रचनेला मोठा झटका बसला आहे. मसूद अझहरचा भाऊ रऊफ अजगर गंभीर जखमी आहे, तर त्याच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाल्याने जैशला जबरदस्त नुकसान सहन करावे लागले आहे. (Indian Air Force precision attack)
संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं की, ही कारवाई केंद्रीत, अचूक आणि निष्पाप लोकांना हानी न पोहोचवणारी होती. या हल्ल्यात भारताने केवळ दहशतवादी ठिकाणांची निवड केली होती. पहलगाममधील हल्ल्यात २५ भारतीयआणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यांना न्याय मिळावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं, असं स्पष्ट करण्यात आलं.
ऑपरेशन सिंदूर ही केवळ एका रात्रीत पार पडलेली कारवाई नव्हती, तर ही भारताची एक सुसंगत, ठाम आणि निर्णायक प्रतिक्रिया होती. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे ही एक धाडसी कामगिरी होती. भारतीय लष्कराचे नियोजन, तांत्रिक कौशल्य आणि संयम यामुळे ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरली. ‘दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता’ ही भारताची भूमिका या कारवाईने पुन्हा अधोरेखित केली आहे.



