
पहलगाम (Pahalgam terror attack) येथील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण असताना, पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर आणखी एक गंभीर घटना घडली आहे. बुधवारी एका बीएसएफ जवानाने चुकून सीमारेषा ओलांडली, त्यानंतर पाकिस्तान रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले आहे. (BSF soldier detained)
ही घटना फिरोजपूरच्या झीरो लाईनवर घडली. हा जवान शेतजमिनींच्या सुरक्षेसाठी तैनात होता. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना विशेष परवानगी असते आणि अशा वेळी बीएसएफ जवान, ज्यांना ‘किसान गार्ड’ म्हणतात, तिथे कर्तव्य बजावत असतात. या जवानाने अनावधानाने सीमा ओलांडल्याचे समजते. (Firozpur border news)
बीएसएफचे अधिकारी जवानाला परत आणण्यासाठी पाकिस्तान रेंजर्सशी चर्चा करत आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत फ्लॅग मीटिंग झाली, पण जवानाची सुटका होऊ शकली नाही. (Flag meeting BSF Pakistan) गुरुवारी रात्री पुन्हा एक बैठक होणार आहे. (India Pakistan border incident)
या घटनेमुळे सीमेवर तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आधीच बिघडले असताना, या जवानाच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही तासांत काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (BSF border crossing)



