
पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत (Parner dairy union election 2025) माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने (Janseva Panel) जोरदार मुसंडी मारत १५ पैकी तब्बल १२ जागांवर विजय मिळवला आहे.
या विजयाने विखे पाटील यांनी सहकारी क्षेत्रात आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. चुरशीच्या या लढतीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या ‘सहकार’ पॅनेलला माघार घ्यावी लागली. या विजयाने तालुक्याच्या राजकारणात विखे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे. (Maharashtra dairy politics news)
पारनेर तालुका दूध संघाची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची लढाई नसून, तालुक्याच्या राजकीय समीकरणांचा कसोटीचा सामना होता. डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः मोर्चा हाती घेत कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लावले. (Parner taluka political updates) विद्यमान आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनीही या निवडणुकीत मोलाची साथ दिली. दुसरीकडे, खासदार निलेश लंके यांनी ‘सहकार’ पॅनेलच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला. मात्र, विखे गटाच्या संघटित रणनीतीसमोर लंके यांचा टिकाव लागला नाही. १२ जागांवर विजय मिळवत जनसेवा पॅनेलने स्पष्ट वर्चस्व गाजवले.
हे वाचलं का? – पाणी नक्की कधी प्यावे? जेवतांना, जेवणाआधी की जेवणानंतर?… वाचा आयुर्वेद काय सांगतं
पारनेर तालुका दूध संघ मागील दहा वर्षांपासून बंद पडला होता. चार वर्षांपूर्वी तो पुन्हा सुरू झाला, पण सध्याचे दूध संकलन केवळ ६,००० लिटर प्रतिदिन आहे. एकेकाळी हेच प्रमाण ७०,००० लिटर इतके होते. या पार्श्वभूमीवर, डॉ. विखे पाटील यांनी दूध संघाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. (Cooperative sector elections Maharashtra)
या निवडणुकीचा परिणाम केवळ दूध संघापुरता मर्यादित नाही. पारनेर तालुक्याच्या राजकारणात सुजय विखे पाटील यांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत विखे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी तालुक्यातील राजकीय पट पूर्णपणे बदलला. निलेश लंके यांचे वर्चस्व असलेल्या अनेक ठिकाणी विखे समर्थकांनी विजय मिळवला. मग ती आमदारकीची निवडणूक असो, किंवा सहकारी संस्थांमधील सत्ता असो, प्रत्येक ठिकाणी लंके यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. (Parner milk union results)
हे वाचलं का? – आता आरोग्य तपासणीसाठी हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही, घरबसल्या चाचण्या करा!
या विजयाने पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रात सुजय विखे पाटील यांचा प्रभाव अधिक दृढ झाला आहे. दूध संघाचा कारभार आता जनसेवा पॅनेलच्या हाती गेल्याने, पुढील काही वर्षे तालुक्याच्या सहकार आणि राजकारणात विखे गटाचा दबदबा कायम राहण्याची शक्यता आहे. दूध संघाला पुन्हा उभारी देण्याचे आव्हान आता विखे यांच्यासमोर आहे. (Sujay Vikhe political influence)
त्यांच्या नेतृत्वाखाली हा दूध संघ पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आधारस्तंभ बनू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पारनेरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे राजकारण आणि सहकार यांचा मेळ साधताना सुजय विखे पाटील यांनी आपली रणनीती आणि संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि दूध संघाच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



