
अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या (ZP) ७५ गटांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज (सोमवार, दि. १३ ऑक्टोबर) पार पडला. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात प्रशासक राजवट असल्याने राजकीय वातावरण शांत होते. मात्र आता आरक्षण जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. स्थानिक नेते, पक्ष संघटनांपासून ते संभाव्य उमेदवारांपर्यंत सर्वांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या आरक्षणानुसार खुल्या प्रवर्गासाठी २९ गट, अनुसूचित जातीसाठी ७ गट, अनुसूचित जमातीसाठी ९ गट, तर इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी २० गट राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमानुसार राखीव करण्यात आले असून, या आरक्षणामुळे विविध तालुक्यांतील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडणार असल्याचे दिसते.
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर आणि उंदीरगाव, नगर तालुक्यातील नागरदेवळे व दरेवाडी, राहाता तालुक्यातील वाकडी, पुणतांबा, साकुरी, तसेच श्रीरामपूरमधील बेलापूर बु. आणि शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव हे गट अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
अकोले तालुक्यातील सातेवाडी, राजूर, समशेरपूर, कोतूळ आणि देवठाण हे पाच गट, संगमनेर तालुक्यातील बोटा, तर राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर हे गट अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या आरक्षणामुळे आदिवासी भागातील नेतृत्वालाही निवडणूक प्रक्रियेत सक्रिय होण्याची संधी मिळणार आहे.
या आरक्षण सोडतीत ओबीसी महिला उमेदवारांसाठी एकूण ७ गट राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात समनापूर, जेऊर, सुरेगाव, शिंगणापूर, टाकळी मिया, सुपा आणि जवळा या गटांचा समावेश आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिला नेतृत्वालाही राजकारणात नवी दिशा मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय जिल्हापरिषद गटांचे आरक्षण
अकोले
१) समशेर पूर : अनुसूचित जमाती
२) देवठाण : अनुसूचित जमाती महिला
३) धामणगाव आवारी : सर्वसाधारण महिला
४) राजूर : अनुसूचित जमाती
५) सातेवाडी : अनुसूचित जमाती महिला
६) कोतुळ : अनुसूचित जमाती
संगमनेर
७) सामनापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
८) तळेगाव : सर्वसाधारण महिला
९) आश्वी बुद्रूक : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१०) जोर्वे : नागरिकांचा मागास प्रवर्ग
११) गुलेवाडी : सर्वसाधारण पुरुष
१२) धांदरफळ बुद्रूक : सर्वसाधारण
१३) चंदनापुरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
१४) बोटा : अनुसूचित जमाती महिला
१५) साकूर : सर्वसाधारण
कोपरगाव
१६) सुरेगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१७) ब्राम्हणगाव : सर्वसाधारण पुरुष
१८) संवत्सर : सर्वसाधारण पुरुष
१९) शिंगणापुर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
२०) पोहेगाव बु. : सर्वसाधारण महिला
राहाता
२१ ) पुणतांबा : अनुसूचित जाती
२२) वाकडी : अनुसूचित जाती
२३) साकुरी : अनुसूचित जाती महिला
२४) लोणी खु : नागरिकांचा मागास प्रवर्ग
२५) कोल्हार बु : सर्वसाधारण
श्रीरामपूर
२६) उंदीरगाव : अनुसूचित जाती महिला
२७) टाकळीभान : सर्वसाधारण महिला
२८) दत्तनगर : अनुसूचित जाती
२९ ) बेलापूर : अनुसूचित जाती महिला
नेवासा
३०) बेलपिंपळगाव : सर्वसाधारण महिला
३१) कुकाणा : सर्वसाधारण महिला
३२) भेंडा बु : सर्वसाधारण पुरुष
३३) भानसहिवरे : सर्वसाधारण पुरुष
३४) खरवंडी : सर्वसाधारण महिला
३५) सोनई : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
३६) चांदा : सर्वसाधारण महिला
शेवगाव
३७) दहिगाव ने : सर्वसाधारण पुरुष
३८) बोधेगाव : सर्वसाधारण पुरुष
३९) भातकुडगाव : अनुसूचित जाती महिला
४०) लाडजळगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
पाथर्डी
४१) कासार पिंपळगाव : सर्वसाधारण पुरुष
४२) भालगाव : सर्वसाधारण पुरुष
४३) तिसगाव : सर्वसाधारण पुरुष
४४) मिरी : सर्वसाधारण महिला
४५ ) टाकळीमानूर : सर्वसाधारण महिला
नगर
४६) नवनागपुर : सर्वसाधारण महिला
४७) जेऊर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४८) नागरदेवळे : अनुसूचित जाती महिला
४९) दरेवाडी : अनुसूचित जाती महिला
५०) निंबळक : नागरिकांचा मागास प्रवर्ग
५१) वाळकी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
राहुरी
५२) टाकळीमिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५३) ब्राह्मणी : सर्वसाधारण
५४) गुहा : सर्वसाधारण पुरुष
५५) बारगाव नांदूर : अनुसूचित जमाती महिला
५६) वांबोरी : सर्वसाधारण महिला
पारनेर
५७) टाकळी ढोकेश्वर : सर्वसाधारण महिला
५८) ढवळपुरी : सर्वसाधारण महिला
५९) जवळा : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
६०) निघोज : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
६१) सुपा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
श्रीगोंदा
६२) येळपणे : सर्वसाधारण पुरुष
६३) कोळगाव : सर्वसाधारण पुरुष
६४) मांडवगण : सर्वसाधारण महिला
६५) आढळगाव : सर्वसाधारण महिला
६६) बेलवंडी : सर्वसाधारण पुरुष
६७) काष्टी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कर्जत
६८) मिरजगाव : सर्वसाधारण पुरुष
६९) चापडगाव : सर्वसाधारण महिला
७०) कुळधरण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
७१) कोरेगाव : सर्वसाधारण महिला
७२) राशीन : नागरिकांचा मागास प्रवर्ग
जामखेड
७३) साकत : सर्वसाधारण पुरुष
७४) खर्डा : सर्वसाधारण पुरुष
७५) जवळा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरक्षणानंतर विविध पक्षांत उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकत्र येत असून, निवडणूकपूर्व राजकीय हालचालींना गती मिळाल्याचे दिसून येत आहे. या आरक्षणामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून उमेदवारांची स्पर्धा रंगणार असून, महिला व मागासवर्गीय प्रतिनिधित्व वाढण्यासही चालना मिळेल. येत्या काही दिवसांत या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
चार वर्षांच्या प्रशासक राजवटीमुळे अनेक स्थानिक नेत्यांना आपले राजकीय भवितव्य काय असेल याची चिंता होती. मात्र, आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांमध्ये आता चैतन्य निर्माण झाले आहे. कोण कोणत्या गटातून निवडणूक लढवणार, कोणत्या गटात नवे चेहरे उभे राहणार आणि युती-आघाडीची समीकरणे कशी जुळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आरक्षणामुळे अनेक विद्यमान नेत्यांना आपले गट सोडावे लागणार असून, ‘बदलणार गट, बदलणार चेहरे’ असे चित्र अहिल्यानगर जिल्हा परिषदेत पाहायला मिळणार आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



