
वैजापूर । दिपक बरकसे
हॅपी टू हेल्प फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील उत्कृष्ठ क्रीडा शिक्षकांना “क्रीडा शिक्षक आदर्श पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आरोहन अकॅडमी इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक मुन्नवर शेख यांची निवड झाली. त्यांच्या या कामगिरीबद्दल स्पंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीवजी डोंगरे यांनी सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट
याप्रसंगी आरोहन अकॅडमीच्या संचालिका डॉ. विजया डोंगरे, सचिव बबनरावजी डोंगरे, शाळेच्या मुख्याध्यापिका बहार खान, तसेच जनार्दन खिल्लारे यांनी मुन्नवर शेख यांचे अभिनंदन केले.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



