
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर येथील बस स्थानकात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त गुरुवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी “स्वच्छ -सुंदर बसस्थानक” अभियानाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सेंट मोनिका शाळेतील विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसर स्वच्छ केला.
राज्यात २३ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत एस.टी.महामंडळाच्या वतीने” हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे”स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून वैजापूर बसस्थानक व आगाराच्या वतीने बस स्थानकात परिसर स्वच्छतेला आरंभ करण्यात आला.
हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट
वैजापूर नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.संगीता नांदूरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते ठाकुर धोंडीरामसिंह राजपूत, सेंट मोनिका इंग्लिश शाळेचे प्रिन्सिपॉल किशोर साळुंके, निवृत्त शिक्षक नागेश बापट. एनसीसी ऑफिसर वकार पठाण यांच्यासह आगार प्रमुख किरण धनवटे यांची उपस्थिती होती.
किरण धनवटे, सहवाहक अधिकारी जी.जे.पगारे, कार्यालयीन अधीक्षक ए.एस. पोटे, वाहतूक निरीक्षक ,बी.के.गरुड, ए.एस.पोटे, ए. बी.मुळे. जोगिंदर ठाकूर, जे.बी.कोकाटे यांनी पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. डॉ,नांदूरकर व राजपूत यांनी उपस्थित छात्र व प्रवाशांना आपला परिसर ,अंगण,बस नेहमी
स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या.
हे वाचलं का? – घसघशीत ‘रिटर्न्स’ मोहात लाखो गुंतवले, आता पश्चात्तापाची वेळ! आयुष्यभराची जमापुंजी गेली
एसटी बसस्थानक परिसर एनसीसी, छात्रासह सर्वांनी स्वच्छ केला. यावेळी भगवान गिरी, संजय झिंझुडे, पी.व्ही.निकाळे,, प्रमुख स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, सहायक रमेश त्रिभुवन यांच्यासह एसटी चालक, वाहक व प्रवाशी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत वर्षभर स्वच्छता अभियानाचे विविध कार्यक्रम घेण्यात येतील असे धनवटे यांनी सांगितले. या अभियान अंतर्गत पहिले बक्षीस रुपये १० लाख रुपये, द्वितीय रुपये पांच लाख व तृतीयसाठी रुपये २.२५ लाख बक्षिस ठेवण्यात आले आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



