
संक्रांती सणानिमित्त पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी असताना छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नायलाॅन मांजाचे रीळ जप्त करण्यात आले.
हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद
वैजापूर शहरातील म्हसोबा चौक येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्या ताब्यातून ३ बॉक्स भरून नायलॉन मांजाच्या चकऱ्या ताब्यात घेतल्या आहे. या कारवाई मध्ये पोलिसांच्या पथकाने ९३,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विराज संदीप सोनवणे (वय 20 वर्षे रा. चांद्रपाल नगर, वैजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



