
वैजापूर । दिपक बरकसे
शहरातील नामांकित चव्हाण-पोद्दार जम्बो किड्स स्कूल आणि बंसल क्लासेस वैजापूर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा 8 फेब्रुवारी 2025 रोजी सुरज लॉन्स, वैजापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ फेम बाल-कलाकार मायरा वायकुळ व बाल खगोलशास्त्रज्ञ अभिनव मारुती विटेकर (इयत्ता 8 वी, बीड) यांची उपस्थिती. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. प्रकाशजी बोथरा (काकाजी) यांनी भूषवले.
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
प्रमुख पाहुणे म्हणून मा. पंढरीनाथ (नाना) चव्हाण, गट-विस्तार अधिकारी मा. मनीष दिवेकर, शिक्षणाधिकारी मा. गणवीर सर, पोलीस निरीक्षक मा. भागवत फुंड, पोलीस उपनिरीक्षक मा. जगताप मॅडम, तसेच डॉ. दिनेश सिंग राजपूत, डॉ. महाडीक, श्री. मनोज गव्हाणे सर आदी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मा. प्रकाश पंढरीनाथ चव्हाण (संचालक, चव्हाण-पोद्दार जम्बो किड्स) आणि मा. चित्रा प्रकाश चव्हाण (संचालक, बंसल क्लासेस वैजापूर) यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. सुवर्णा कदम मॅडम (प्रिन्सिपल, चव्हाण-पोद्दार जम्बो किड्स) यांनी केले.
हे वाचलं का? – जिल्हा बँकेच्या महिला कॅशिअरचा विनयभंग, तालुका विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
तसेच मा. राहुल सागर सर (शाखा व्यवस्थापक, बंसल क्लासेस, वैजापूर) यांनी आभार मानले. शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शानदार प्रदर्शनामुळे पालक आणि उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



