
राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानगंगा एज्युकेशनच्या शिष्यवृत्ती (Gyanganga Education Scholarship 2025) परीक्षेत कोपरगाव (Kopergoan) तालुक्याच्या कीर्ती विजय गवळी (Kirti Gawali) हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत आपले नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेच्यावतीने ५१,००० रुपये रोख रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली.
डिसेंबर २०२४ मध्ये बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. लि. या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बोर्डपूर्व लाईव्ह परीक्षेत राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कडव्या स्पर्धेत कीर्तीने आपल्या उल्लेखनीय मेहनतीच्या जोरावर दुसरे स्थान मिळवले. यासाठी तिला संस्थेचे विभागीय संचालक आणि शिक्षक तनेश लोंगाणी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. (Top rankers in Maharashtra scholarship exam)
हे वाचलं का? – लासुरच्या आराध्या लोढाचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
या परीक्षेत नारायणगाव येथील अर्पिता हांडे हिने प्रथम क्रमांक मिळवत १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली. तर इस्लामपूरच्या पायल चव्हाण हिला तिसरा क्रमांक मिळून २१,००० रुपये देण्यात आले. विजेत्यांचा सन्मान गुरुवर्य रा.प. सबनीस कनिष्ठ महाविद्यालयातील वसंत व्हीला येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीरत्न अनिल मेहेर होते. (Rural education success stories)
‘स्वयंअध्ययनातून सर्वोत्तम शिक्षण’ हे ब्रीदवाक्य घेऊन ज्ञानगंगा एज्युकेशन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थापक अमोल आरकस यांनी यावेळी सांगितले, “आत्तापर्यंत आमच्या संस्थेशी जोडले गेलेला एकही विद्यार्थी ६० टक्क्यांखाली गेला नाही. विद्यार्थ्यांचा असा विकास केवळ अभ्यासक्रम न पाजळता, योग्य दिशादर्शन करून झाला आहे.” (Scholarship for 12th Science students)
हे वाचलं का? – बारावीचा निकाल तर लागला, पण आता पुढे काय? कुठल्या क्षेत्रात कोणते कोर्सेस उत्तम?
कार्यक्रमात बोलताना उपप्राचार्य हनुमंत काळे म्हणाले, “ज्ञानगंगा एज्युकेशनच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सीईटीसह बारावीच्या परीक्षेसाठीही उत्तम तयारी करता येते. आमच्या महाविद्यालयातील अर्पिता हांडे हिने राज्यात अव्वल येत आमचा सन्मान वाढवला आहे.” शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत ज्ञानगंगा एज्युकेशनच्या परीक्षेमुळे आपल्या तयारीचे नेमके चित्र समोर आले आणि चुका सुधारण्याची संधी मिळाली, असे सांगितले. सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि परीक्षेचा अनुभव लाभल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात राज्यभरातून पहिल्या दहा क्रमांकांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा फेटा बांधून, रोख शिष्यवृत्ती, एक रोपटे आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानगंगाचे विभागीय संचालक संतोष आरकस, अन्सार मुल्ला, वैभव आरकस, रमेश शेटे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अमोल आरकस यांनी केले. सूत्रसंचालन रमेश शेटे यांनी केले तर आभारप्रदर्शन तनेश लोंगाणी यांनी केले. हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचे नव्हे तर ग्रामीण भागातील शिक्षणप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरला.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



