बारावीचा निकाल लागला, पण पुढे काय? कुठल्या क्षेत्रात कोणते कोर्सेस उत्तम | Photo - Canva

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून हजारो विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे हा शैक्षणिक टप्पा पूर्ण केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, चिंता आणि भविष्याच्या स्वप्नांचा मेळ पाहायला मिळत आहे. (after 12th career options) बारावीचा निकाल हा केवळ शैक्षणिक यशाचे मोजमाप नाही, तर विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. पण निकालानंतर पुढे काय? कोणत्या संधी उपलब्ध आहेत? कोणती आव्हाने येऊ शकतात? या लेखात आपण बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीचा आढावा घेऊ.

आपली आवड ओळखा

निकालानंतर लगेच कॉलेज किंवा कोर्स निवडण्याआधी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी, कौशल्ये व दीर्घकालीन ध्येयांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. “मित्र जातोय म्हणून”, “पालक म्हणतात म्हणून” हे निकष चुकीचे ठरू शकतात. याऐवजी खालील गोष्टींचा विचार करावा:

  • मला कोणते विषय आवडतात?
  • मी कोणत्या कामात आनंद अनुभवतो?
  • माझे करिअर स्वप्न काय आहे?
  • मी दीर्घकालीन अभ्यास करायला तयार आहे का?

वरील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मिळवलीत, तर पुढचा मार्ग स्पष्ट होतो.

सायन्स (Science) प्रवाहातील प्रमुख कोर्सेस (courses after 12th science)

  • इंजिनिअरिंग (B.E./B.Tech) : ज्यांना तांत्रिक गोष्टी, गणित, भौतिकशास्त्र यांत रस आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय. महाराष्ट्रात MHT-CET, तर भारतात JEE द्वारे प्रवेश मिळतो.
  • वैद्यकीय क्षेत्र (MBBS, BDS, BAMS, BHMS, BPT) : NEET ही एकमेव प्रवेश परीक्षा. यामध्ये डॉक्टर, दंतवैद्य, आयुर्वेदिक वैद्य, होमिओपॅथिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट बनता येते.
  • Pure Sciences (B.Sc.) : Physics, Chemistry, Biology, Maths, IT, Computer Science इ. मध्ये पदवी. संशोधन, अध्यापन, UPSC साठी चांगला पाया.
  • इतर पर्याय : B.Sc. Agriculture, Biotechnology, Environmental Science, Forensic Science, Nursing इ. क्षेत्रांमध्येही उत्तम संधी आहेत.

कॉमर्स (Commerce) प्रवाहातील कोर्सेस (best commerce courses)

  • B.Com, BBA, BMS : व्यवसाय, व्यवस्थापन, वित्त आणि अर्थशास्त्र यात करिअर करण्यासाठी उत्तम कोर्सेस.
  • CA, CS, CMA : चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट – हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. ICAI, ICSI व ICMAI मार्फत प्रवेश.
  • बँकिंग आणि फायनान्स कोर्सेस : Investment Banking, Financial Analyst, Insurance इत्यादी क्षेत्रात रोजगारासाठी CFA, CFP सारखे कोर्सेस उपयुक्त.

आर्ट्स (Arts) प्रवाहातील कोर्सेस (arts stream careers)

  • B.A. (Bachelor of Arts) : History, Political Science, Sociology, Psychology, Literature, Philosophy यासारख्या विषयांत पदवी अभ्यासक्रम.
  • Mass Communication, Journalism, Animation, Fashion Design : क्रिएटिव्ह आणि कम्युनिकेशन स्किल्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअर संधी.
  • Law (कायदा शिक्षण) : 5 वर्षांचा इंटीग्रेटेड LLB कोर्स (BA-LLB, BBA-LLB). CLAT, MH-CET (Law) च्या माध्यमातून प्रवेश.

व्होकेशनल कोर्सेस व कौशल्याधारित शिक्षण (professional courses after 12th)

सध्या पारंपरिक शिक्षणासोबत स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्सेसनाही मोठी मागणी आहे. बारावीनंतर खालील काही व्यावसायिक कोर्सेस निवडता येतात:

  • डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, UX/UI डिझाईन
  • फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, मोशन ग्राफिक्स
  • वेब डेव्हलपमेंट, डेटा अ‍ॅनालिटिक्स, AI/ML बेसिक कोर्सेस
  • हॉटेल मॅनेजमेंट, शेफ कोर्सेस, इव्हेंट मॅनेजमेंट
  • फिटनेस ट्रेनिंग, स्पोर्ट्स कोचिंग, योग शिक्षक प्रशिक्षण

हे कोर्सेस अल्पावधीत पूर्ण होऊन रोजगारासाठी तयार करतात. अशा कोर्सेससाठी NSDC, ITI आणि खासगी संस्थांचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत.

सरकारी नोकऱ्या व स्पर्धा परीक्षा (government jobs after 12t)

काही विद्यार्थी १२वी नंतर लगेच सरकारी नोकरीची वाट धरू इच्छितात. यासाठी खालील पर्याय उपयुक्त ठरतात:

  • NDA (सैन्य सेवा प्रवेशासाठी)
  • SSC CHSL, MTS
  • रेल्वे भरती परीक्षा
  • पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक परीक्षा
  • बँकिंग सेक्टर – IBPS Clerk/PO (पुढील शिक्षणासोबत शक्य)

अशा परीक्षा देताना सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, इंग्रजी आणि गणित यामध्ये तयारी आवश्यक असते.

परदेशी शिक्षणाची दिशा (study abroad after 12th)

विदेशात उच्च शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही बारावीनंतरचा टप्पा महत्त्वाचा असतो. यासाठी आवश्यक तयारी खालील प्रमाणे असते:

  • USA, UK, Canada, Australia, Germany हे लोकप्रिय देश.
  • IELTS, TOEFL, SAT, GRE यासारख्या परीक्षा आवश्यक.
  • स्कॉलरशिप्स आणि एज्युकेशन लोनद्वारे आर्थिक मदत उपलब्ध.
  • Bachelors in Science, Business, Computer Science, Arts इ. प्रकारचे कोर्सेस

विदेशी शिक्षणाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने १२वीनंतर लगेच तयारी सुरू करणे गरजेचे.

उद्योजकता

“नोकरी मागणारे नव्हे, तर देणारे बना” हा मंत्र सध्या अनेक तरुण पिढी आत्मसात करत आहे. तुम्हाला एखादा कल्पक व्यवसाय, सेवा किंवा स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा असल्यास खालील पर्याय वापरता येतात:

  • Start-up India, PMEGP, Mudra Loan योजना
  • डिजिटल बिझनेस – यूट्यूब, ई-कॉमर्स, ब्लॉगिंग
  • स्थानिक सेवा – फूड स्टॉल, क्लासेस, फ्रीलान्सिंग

व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान, डिजिटल स्किल्स व आर्थिक नियोजन यासोबत योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे असते.

करिअर काउन्सिलिंगची गरज आणि महत्त्व

अनेक वेळा विद्यार्थी गोंधळात निर्णय घेतात. अशा वेळी योग्य काउन्सिलिंग मिळाल्यास त्यांच्या क्षमतेप्रमाणे योग्य क्षेत्र निवडता येते. मानसशास्त्रीय चाचण्या, Aptitude Test, आणि स्वारस्य आधारित विश्लेषण यातून व्यक्तिमत्वाचे समज वाढते.

पालकांनी मुलांवर करिअर बाबत निर्णय लादू नये. त्यांच्या आवडीला प्रोत्साहन द्यावे, चर्चा करावी, आणि गरज असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून द्यावे. “हमें जमाने में हे सब नहीं होता था…” असा दृष्टिकोन न ठेवता, मुलांच्या काळाची गरज समजून घ्यावी.

बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण त्यांच्या भविष्याचा मार्ग ठरवण्यासाठी त्यांना योग्य माहिती, प्रेरणा, आणि समर्थनाची गरज आहे. आजच्या युगात संधींची कमतरता नाही, फक्त योग्य दिशेने पाऊल टाकण्याची गरज आहे. मग तुम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य, किंवा उद्योजकता यापैकी कोणताही मार्ग निवडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनतीने पुढे जा. तुमचे यश तुमच्या हातात आहे! (vocational training)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here