सैफ अली खानच्या घरात नेमकं काय घडलं? FIR मध्ये धक्कादायक माहिती समोर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री धारदार शस्त्राने एका अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला. अज्ञाताने अभिनेत्यावर ६ वार केले होते. त्यातील २ वार अत्यंत खोलवर आणि तर बाकीच्या जखमाही किरकोळ आहेत.

त्यानंतर अभिनेत्याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ज्यावेळी अभिनेत्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब घरातच होतं. सैफवर आज सकाळी यशस्वी रित्या डॉक्टरांच्या टीमकडून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद

दरम्यान सैफ अली याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची धक्कादायक एफआयआर कॉपी समोर आली आहे. दोन पानांच्या या एफआयआर कॉपीमध्ये आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या स्टाफने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने एक कोटी रुपयांची मागणी केली.

सैफ अली खानच्या घरात आलेल्या आरोपीला तुला काय हवं आहे? असं विचारण्यात आलं तेव्हा त्याने पैसे हवे आहेत, असं सांगितलं. यानंतर किती पैसे हवे आहेत? असं विचारल्यावर त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर आरोपीने सैफ अली खानच्या मोलकरणीवर हल्ला केला. आरोपीने मोलकरणीच्या दोन्ही हातांवर चाकूने वार केले.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here