
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मेहुण्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. विलास खेडकर यांच्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून त्यांना जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.
अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. तडीपार झालेल्यांमध्ये विलास खेडकर (Vilas Khedkar) यांच्यासह अमोल पंडित, गोरख कुरणकर, संदीप लोहकरे, केशव वायभट, संयोग सोळुंके, गजानन सोळुंके, रामदास तौर आणि वामन तौर यांचा समावेश आहे. (Jalna Police Action)
हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद
विलास खेडकर यांच्यावर वाळू चोरी (Illegal Sand Mining), अवैध वाळू वाहतूक, सरकारी कामात अडथळा, जाळपोळ आणि जीवघेण्या हल्ल्याचे आरोप आहेत. २०२१ मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, २०२३ मध्ये जालना जिल्ह्यातील शहागड येथे बस जाळल्याच्या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३०७, ३५३ आणि ४३५ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय, गोदावरी नदीतून लाखोंच्या किंमतीची वाळू चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
विशेष म्हणजे, तडीपार झालेल्या नऊ आरोपींपैकी सहाजण हे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होते. १ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या दगडफेकीनंतर झालेल्या हिंसाचारात विलास खेडकर यांच्यासह इतर चार आरोपींवर बस जाळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
हे वाचलं का? – भरधाव कारची दुचाकीला धडक; अपघातात पती-पत्नी जखमी
मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे १०० टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही…पाहुण्यांचा तर विषय संपला, असं मनोज जरांगे म्हणाले.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



