
राज्यात अपहरण आणि हत्या प्रकरणांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी असते, ज्यांमुळे नागरिक बिनधास्त जीवन जगतात, त्याच पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण (Police kidnapping Maharashtra) झाल्याची घटना घडली आहे. (Jalgaon district news)
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत उमर्टी गावात जाऊन आपल्या कर्मचाऱ्याची सुखरुप सुटका केली आहे. मात्र, या घटनेनं पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच अपहरण होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय (Law and order crisis), असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Maharashtra MP border crime)
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. चोपडा ग्रामीण पोलीस हे महाराष्ट्रात असलेल्या ऊमर्टी गावात गेले आणि तिथं पोलिसांनी आरोपीला अटक केली मात्र त्याचवेळी आरोपीला अटक केल्याने काही जण पोलिसांवर धावून गेले. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण (Police officer abduction) करून त्याला मध्य प्रदेशातील ऊमर्टी गावात घेऊन गेले.
आरोपीला सोडा तोपर्यंत पोलिसाला सोडणार नाही, अशी भूमिका अपहरण करणाऱ्यांनी घेतली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी उमर्टी गावाकडे तातडीने रवाना झाले. घटने संदर्भात मध्य प्रदेश पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. अखेरीस उमर्टी गावातून अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलं आहे. आरोपींच्या तावडीतून पोलीस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली आहे. (Crime rate in Maharashtra)
हे वाचलं का? – जिल्हा बँकेच्या महिला कॅशिअरचा विनयभंग, तालुका विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच्या धैर्याने पोलीस यंत्रणाच हादरली आहे. पोलिसांना अशा प्रकारे गुन्हेगारांच्या टार्गेटवर ठेवले जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय हा चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाणही धोकादायक पातळीवर पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (Maharashtra crime news)
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



