
वैजापूर । दिपक बरकसे
मयत झालेल्या व्यक्तीच्या भावाने त्याच्या खात्यातून मुलाच्या सहाय्याने 74 हजारांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (Bank fraud). या प्रकरणी वैजापूर पोलिसांत १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (financial fraud)
या प्रकरणात सोनाबाई हिरालाल सुलाने (वय ७५ वर्षे, राहणार डोनगाव, तालुका गंगापूर, सध्या मुक्काम जालाननगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा रमेश सुलाने यांचे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी आजाराने निधन झाले होते. रमेश यांचा पोल्ट्री व्यवसाय होता आणि त्यांनी सगुणा कंपनीशी करार केला होता. (cheque fraud)
हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा
या व्यवसायासाठी त्यांनी वैजापूर येथील एचडीएफसी बँकेत खाते उघडले होते. कंपनीशी झालेल्या सर्व आर्थिक व्यवहार या खात्याद्वारे होत होते. रमेश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यात २४,२०४ रुपये होते. त्यानंतर सगुणा कंपनीने त्यांच्या खात्यावर ५१,४२१ रुपये जमा केल्याने एकूण रक्कम ७४,६५२ रुपये झाली. (HDFC bank fraud)
रमेश यांच्या निधनामुळे फिर्यादी दुःखात असताना, त्यांचा दुसरा मुलगा प्रेमसिंग आणि त्याच्या मुलाने रमेश यांच्या बँक खात्याचे चेक घेऊन ते वटवले. प्रेमसिंग याने चेकद्वारे संपूर्ण ७४ हजार रुपयांची रक्कम आपल्या मुलाच्या खात्यात जमा करून घेतली.
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
हा प्रकार समोर आल्यानंतर वैजापूर पोलिसांनी मंगळवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी गुन्हा दाखल केला आहे. (fraud investigation) या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Vaijapur crime news)
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



