
वैजापूर | दीपक बरकसे
जागतिक योग दिनानिमित्त जय भवानी नगर, आघुर येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन संयोजक केतन पा. आव्हाळे, सहसंयोजक नवनाथ चन्ने व आकाश बागुल यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश भाऊ परदेशी (संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व माजी नगराध्यक्ष, वैजापूर), कैलासजी पवार (माजी तालुकाध्यक्ष, भाजपा वैजापूर), सुरेशजी राऊत (माजी पंचायत समिती सदस्य तथा तालुका अध्यक्ष, भाजपा उत्तर मंडळ, वैजापूर), मधुकरजी पवार (भाजपा नेते), सौ. शिवकन्या पवार (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वैजापूर), नारायणजी कवडे, गोरखजी घायवट, राजेंद्र जाधव (सोशल मीडिया अध्यक्ष, भाजपा वैजापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.
हे वाचलं का? – तुमच्या मुलाची शाळा खरंच सुरक्षित आहे? शाळेकडून मागा ‘हा’ अहवाल
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ढगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मगर सर यांनी मानले. योग मार्गदर्शनासाठी योगगुरू बाळासाहेब व्यवहारे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगत विविध योगासने करून घेतली. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य व्यावहारे सर, अनिलजी आव्हाळे, सुभाष आव्हाळे, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये योग आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरला. उपस्थित मान्यवरांनी योगाच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वावर भर देत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे आवाहन केले.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



