
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर येथे आमदार रमेश बोरनारे यांचे ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी गुलाबराव साळुंके, वसंतराव साळुंके, बाबासाहेब जगताप, उत्तराव साळुंके, अण्णासाहेब शेळके, पोपट भोसले, प्रकाश साळुंके, बाबुराव वाणी, रंजक शेटे, रामकीसन जोरे, सोपानराव निकम, ॲड. धरमसिंह राजपूत, रोडगे नाना आणि श्री. शेळके यांनी आमदार बोरनारे यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. माजी उपनगराध्यक्ष साबेरखान यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, डॉ. राजीव डोंगरे, खुशालसिंह राजपूत, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, डॉ. निलेश भाटिया, डॉ. संतोष गगवाल, डॉ. भांड, पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत, सखाहरी बर्डे, कृषी समिती संचालक प्रशांत त्रिभुवन, वसंत त्रिभुवन, बबन त्रिभुवन, शाळा समितीचे राजेंद्र साळुंके, दिलीप गावडे, अशोक चव्हाण, कयूम सौदागर, हमीद कुरेशी, खलील मिस्तरी, आमीरअली, ज्येष्ठ पत्रकार घनश्याम वाणी, अमोल बोरनारे, अशोक पवार, खंडाळकर बापू गावडे आणि मुख्याध्यापक आर. डी. वसावे उपस्थित होते.

महिला आघाडीच्या सुलभा भोपळे, छायाताई बोरनारे, पद्मा साळुंके, श्रीमती खैरनार आणि अनिता दाणे यांच्यासह अनेक महिला सदस्यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात पालिकेच्या सर्व शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



