
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील चांडगाव शिवारात गुरुवारी सकाळी एका शेतात अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत तब्बल १५० क्विंटलहून अधिक मका जळून खाक झाली असून, संबंधित शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Vaijapur farm fire)
ही दुर्घटना चांडगाव शिवारातील गट क्रमांक ४८ मध्ये घडली. या गटात पुंजाबा दामू वैद्य यांचे शेती क्षेत्र आहे. गुरुवारी सकाळी अचानक त्यांच्या शेतात आग लागली. या आगीत त्यांनी काढून ठेवलेली आणि साठवलेली मका पूर्णतः जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे स्पार्किंग होऊन आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हवामान कोरडे असल्याने आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले आणि शेतातील सर्व मका काही मिनिटांत भस्मसात झाला. (maize crop fire Maharashtra)
हे वाचलं का? – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा चांगला पाऊस, महाराष्ट्रात कधी बरसणार? APEC ने वर्तवला मोठा अंदाज
या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, आगीमुळे सुमारे ३.५ एकर क्षेत्रातील मका पूर्णपणे जळून गेला असून, १५० क्विंटलपेक्षा जास्त मक्याचे उत्पादन नष्ट झाले आहे. शेतकरी पुंजाबा वैद्य यांनी नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. “हे नुकसान भरून काढणे माझ्यासारख्या छोट्या शेतकऱ्यासाठी शक्य नाही. शासनाने त्वरीत पंचनाम्यावरून नुकसान भरपाई द्यावी,” अशी प्रतिक्रिया वैद्य यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (farmer loss due to fire)
हे वाचलं का? – मधमाश्यांची संख्या घटली, कांदा बीज उत्पादन धोक्यात! शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता पसरली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विद्युत तारा ढिल्या होऊन स्पार्किंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महावितरणने ग्रामीण भागातील विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. या आगीत आर्थिक नुकसान तर झालेच, पण शेतकऱ्यांचे श्रम आणि मेहनतीवरही पाणी फिरले आहे. सरकारी यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतूनही करण्यात येत आहे. (Maharashtra farmer news)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



