आंतरराष्ट्रीय योग दिन वैजापूरात उत्साहात साजरा | Photo Credit: Deepak barkase

वैजापूर | दीपक बरकसे

वैभव शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती इंटरनॅशनल स्कूल, कैलास पाटील माध्यमिक विद्यालय, मुक्ताई प्राथमिक विद्यालय, सुशीलाबाई कदम अध्यापक विद्यालय आणि कदम कॉलेज ऑफ फार्मसी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.

योग प्रशिक्षक घेर सर आणि मुख्याध्यापक रवींद्र टुपके यांनी योगाचे फायदे आणि त्याचे दैनंदिन जीवनातील योगदान याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्राणायामासह विविध योगासने सहजतेने करून आपली आवड आणि उत्साह दाखवला.

हे वाचलं का? – तुमच्या मुलाची शाळा खरंच सुरक्षित आहे? शाळेकडून मागा ‘हा’ अहवाल

कार्यक्रमात कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण कदम, विक्रम कदम, पवार सर, ठोसर सर, राऊत सर यांच्यासह छत्रपती स्कूलच्या व्यवस्थापक सुषमा कदम, पर्यवेक्षक सोनाली मॅडम, घेर सर आणि इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कदम आणि सचिव कुणाल कदम यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासह त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला प्रोत्साहन दिले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, ज्यामुळे योग दिनाचा उत्साह द्विगुणित झाला.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

International Yoga Day Celebrated with Enthusiasm in Vaijapur Schools and Colleges

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here