वैजापूर । दिपक बरकसे

अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असा आरोप करत शेतकरी संघटनेकडून तहसील कार्यालयसमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ काही शेतकरी आंदोलकांनी आक्रमणक होत जलकुंभावर चढत आंदोलन केले. यानंतर शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांनीही आंदोलनस्थळी शुक्रवारी उपस्थिती नोंदवली व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या नंतर तब्बल 32 तासानंतर पाण्याच्या टाकीवर चढलेले आंदोलक हे अखेर खाली उतरले.

आंदोलनाला सुरवात झाल्या नंतर पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेत विविध मागण्या मांडण्यात आल्या ज्यामध्ये अनुदान वाटप झालेल्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली.कागदपत्रे समोर आल्यानंतर अनेक मंडळात शून्य बागायती क्षेत्र लावले असल्याचे समोर आले तर दुसऱ्या टप्प्याच्या चर्चेत मका, कापशी ही पिके बागायती क्षेत्रात बागायती म्हणून घेतली जातात त्यामुळे फेरपंचनामे करून बागायती क्षेत्र प्रमाणे अनुदान देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी याबाबत कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन मागवावे लागेल असे सांगण्यात आले यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात कुठल्या आधारावर अनुदान वाटप करण्यात आले याबाबत माहिती मागवण्यात आली. दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दुपारपर्यंत सदरील विद्यापीठाचे पत्र व पश्चिम महाराष्ट्रातील माहिती न आल्याने आंदोलकांनी आक्रमक होत पाण्याच्या टाकीवर जात आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांनी आंदोलन स्थळी येऊन प्रशासनाशी चर्चा केली.

दरम्यान तोपर्यंत विद्यापीठाचे पत्रही आले होते या पत्रातील मजकुरानुसार मका कपाशी ही पिके पावसाचा खंड पडल्यास बागायती म्हणून संबोधल्यात जाऊ शकते असा बोध निघाला त्यामुळे यंदा पावसाळ्यात खंडही पडला होता नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन हे सोडण्यात आले होते ज्यामुळे सदरील पत्राच्या अनुषंगाने सदरील पिके ही बागायती म्हणून संबोधल्यात जाऊ शकतात या आधारावर शेतकरी संघटनेने याबाबत कृषी विभागाचा अभिप्राय मागून तात्काळ यावर कारवाई करावी अशी मागणी केली तर दरम्यान लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत अखेर उपोषण सोडले.

काय होत्या आंदोलकांच्या मागण्या?

पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मका,कापूस सोयाबीन या पिकांना हंगामी बागायती प्रमाणे 17 हजार रुपये हेक्टरी अनुदान दिले मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपये अनुदान मिळाले,मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे चुकले अशा शेतकऱ्यांचे पंचनामे पुन्हा करावे.अनुदान,पिकाचे पेमेंट यावर बँकांनी होल्ड लाऊ नये.या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

कागदपत्रांच्या आधारावर वाढली आंदोलनाची धार…

शेतकऱ्याने एकापाठोपाठ एक काढलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मुद्देसूद कागदपत्रे प्रशासनाकडून काढून घेत या आंदोलनाची धार वाढवली ज्यामुळे कागदपत्रांच्या आधारावरच हे आंदोलन चर्चेत आले.

हे यश शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि पाठिंब्याचे

हे यश केवळ शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झाले या आंदोलनाला 6500 हून अधिक शेतकऱ्यांनी आंदोलस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आणि शेतकऱ्यांच्या या पाठिंब्यामुळेच हे यश प्राप्त झाले यापुढे देखील शेतकऱ्यांचे हक्कासाठी लढणार असे विधान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश तांबे यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे संघटित व्हा

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही आता संघटित होऊन लोकप्रतिनिधींच्या भरोशावर न बसता स्वतः आंदोलनाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडून घ्यावे असे आवाहन प्रसंगी उपोषणकर्ते बाळासाहेब जानराव यांनी केले.

यश मिळाले मात्र लढा सुरूच राहणार

यश मिळाले मात्र शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळे पर्यंत लढा सुरूच राहणार,शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार अशी भूमिका आंदोलनात सहभागी उपोषणकर्ते हिंदवी जनक्रांतीचे अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांनी मांडली.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here