पंचगंगा ऊद्योग समुहाने ऊस वजन, पारदर्शक काटा व योग्य भाव जाहीर केला - महंत रामगिरी महाराज

वैजापूर । दिपक बरकसे

ऊस कमी असल्यावर कारखाने चकरा मारतात मात्र भरघोष पिकल्यानंतर तोडणीचे पैसे देऊनही कुठलाही कारखाना ऊभ्या ऊसाला तोड देत नव्हता या परिस्थितीतून वैजापूर तालुक्यातील शेतकरी पोळून निघालेला असताना.पंचगंगा ऊद्योग समुहाने शेतकऱ्यासाठी साखर कारखान्याची नुकतीच ऊभारणी केलेली नाही तर पारदर्शक काटा व योग्य भांव जाहीर केला असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी पंचगंगा कारखान्याचे व्दितीय गळीत हंगाम मोळी टाकण्याचे शुभारंभ प्रसंगी आशिर्वादपर मनोगत व्यक्त करताना केले.

पंचगंगा ऊद्योग समुह संचलीत पंचगंगा शुगर & पॉवर प्रा. लि.महालगांव ( ता.वैजापूर) या खाजगी साखर कारखान्याचा व्दितीय गळीत हंगाम मोळी टाकण्याचा शुभारंभ महंत रामगिरी महाराज, ऊत्तमराव गोविंदरांव शिंदे यांच्या शुभहस्ते आ.रमेश बोरनारे, आ.विठ्ठलरांव लंघे, जि‌प.माजी सभापती अविनाश गलांडे, कारखाना अध्यक्ष प्रभाकररांव शिंदे, संचालक कुंडलिकराव माने, चार्टर्ड अकौंटंट भाऊरांव गायकवाड यांच्या प्रमुख ऊपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी आशिर्वादपर मनोगत व्यक्त करताना महाराज पुढे म्हणाले की वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाची मध्यतंरी हेळसांड झाल्याने ऊसाचे क्षेत्रात घट झाली होती.मात्र आपल्या हक्काचा पंचगंगा साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे. पंचगंगा ऊद्योग समुहाने सीड ऊद्योगात भारतात नांव लौकिक मिळवला आहे. संत महंतांचे सानिध्यातील अध्यात्मिक शिंदे परिवारांने मेहनत कष्ट अन ईमानदारीने व्यवसायाची प्रगती केल्याने या साखर ऊद्योगात त्यांना यश प्राप्त होणार असल्याचा आशिर्वाद महंत रामगिरी महाराज यांनी आपल्या मनोगताचे शेवटी दिला.

आपले प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना पंचगंगाचे अध्यक्ष प्रभाकररांव शिंदे म्हणाले की आपण प्रथम गळीत हंगामासाठी आपण शेतकऱ्यांना जाहीर केलेला २८५० भाव दिला.याबरोबरच शेतकऱ्यांना बाहेरून काटा करण्यास परवानगी दिली.प्रथम गळीत हंगामात थोड्या कालावधीत आम्ही तीन लाख टनापेक्षा जादा गळीत करु शकलो.यासाठी कारखाना व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी यांनी दोन दोन शीपमध्ये काम करून अविरत परिश्रम घेतले. या व्दितीय गळीत हंगामात साडेसहा लाखाहून अधिक ऊद्दिष्ट पूर्ण करणार आहोत.

वैजापूरसह शेजारच्या तालुक्यात मका पीकाचे भरघोष ऊत्पादन झाले आहे.जमिनीत ओलावा टिकुन असल्याने शेतकऱ्यांना मका सुकविताना अडचण येते. माऊचर गुणवत्तेत खुपच ओलावा असल्याने पुढील आठवड्यात आम्ही मका डिस्टलरी प्रकल्प सुरू करत आहोत. शेतकऱ्यांना कारखान्यावर मका आणण्यापूर्वी विनामुल्य मका शॉम्पल माऊऊचर टेस्ट करून देण्यात येईल. कमीतकमी १५०० रूपये क्विंटल दरापासून पुढे दररोज निघणाऱ्या बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार रमेश बोरनारे,आमदार विठ्ठलरांव लंघे यांनीही पंचगंगा ऊद्योग समुहाचे या साखर कारखान्याचे कार्याची प्रश़ंसा करत मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कापसे पैठणी ऊद्योग समुहाचे बाळासाहेब कापसे,माजी सभापती बाबासाहेब जगताप , विजय पवार, बाळासाहेब पवार टेंभीकर, सरपंच नानासाहेब काळे,ऊपसरपंच सुरेश आल्हाट, डॉ प्रकाश शेळके, राजेंद्र गलांडे, भाऊरांव भराडे, शिवाजी बनकर, भाऊसाहेब झिंजुर्डे, मंगेश गायकवाड, बाबासाहेब शिंदे, विवेक शिंदे, बाळासाहेब शिंदे, कॅप्टन प्रशांत माने, सचिन माने, प्रबोध शिंदे, प्रविण पवार, मच्छिद्र पठाडे,तेजस शिंदे, प्रा.रंगनाथ कोळसे आदी उपस्थित होते.

रिकव्हरी असणारे वाणास ३१५० व सर्वाधिक क्षेत्र असलेल्या २६५ या वाणास ३०५० भाव – शिंदे

आपल्या प्रास्ताविकांत या गळीत हंगामातील ऊस दराची घोषणा करताना अध्यक्ष प्रभाकररांव शिंदे म्हणाले की या गळीत हंगामात ८६०३२, ३१०२, ८००५, १८१२१, १०००१, या जादा रिकव्हरी देणाऱ्या ऊस वाणासाठी ३१५० तर सध्या सर्वाधिक शेतकऱ्याकडे असणाऱ्या २६५ व अन्य वाणासाठी ३०५० प्रती टन भांव देणार असल्याचे जाहीर करताच ऊपस्थितांनी टाळ्याचे गजरात स्वागत केले. मध्यंतरी घडलेल्या अब्रू नुकसान नोटिस खुलासा करताना शिंदे म्हणाले की पंचक्रोशितील गावोगावच्या शेतकऱ्यांना अर्धा पाऊण तासाचे अंतरावर कारखाना आहे.समस्या असेल तर कारखान्यावर समक्ष येऊन चर्चा करा निश्चित मार्ग निघेल.परंतू चर्चा न करता सोशल मिडीया सोबत आणून कारखान्याविषयी चुकीचा मेसेज पसरविण्याचा प्रयत्न झाला.त्यामुळे नाईलाजाने आम्हाला टोकाचे पाऊल ऊचलावे लागले असल्याचे शेवटी शिंदे म्हणाले.

वजन माप काट्याचे बाबतीत आता त्यांनाही पंचगंगा शुगर प्रमाणे पारदर्शकता ठेवावी लागणार – महंत रामगिरी महाराज

पंचगंगा ऊद्योग समुहाचा व्यवहार प्रारंभीपासून जोडुनिया धन ऊत्तम व्यवहारे असल्याने प्रथम गळीत हंगामापासुन काट्यामध्ये पारदर्शकता ठेवलेली आहे.कारण माप काट्याचे बाबतीत विचार केला तर एवढी पारदर्शकता कुणीच ठेवलेली नाही. शेतकऱ्यांनी बाहेरून काटा करून आणल्यास कारखाने ऊस स्विकारत नाहीत.काट्याबाबद यापुढे त्यांनाही पारदर्शकता ठेवावी लागणार .नाहीतर काय? परिणाम होतील हे सर्वाना कळते असे महाराज म्हणाले.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here