वैजापूर । दीपक बरकसे

राजकारण आणि समाजकारणात तरुणाईचा सहभाग वाढत असताना, भारतीय जनता पक्षाने (भाजप) वैजापूर तालुक्यात युवा नेतृत्वाला प्रोत्साहन दिले आहे. भाजपच्या उत्तर मंडळाच्या तालुका कार्यकारणीच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीमध्ये केतन दिगंबर पाटील आव्हाळे यांची तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि उत्तर मंडळाचे तालुकाध्यक्ष सुरेश राऊत यांनी जाहीर केली.

केतन आव्हाळे यांच्या निवडीमुळे वैजापूर तालुक्यातील भाजपच्या संघटनात्मक कामाला एक नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तरुण आणि उत्साही नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, या निवडीमुळे पक्षाला विशेषतः युवा वर्गापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या निवडीनंतर केतन पाटील आव्हाळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. दिनेश परदेशी, कैलास पवार, गोरख घायवट, तालुकाध्यक्ष सुरेश राऊत यांच्यासह पंकज मतसागर, प्रेम राजपूत, प्रवीण तांबे, फकीरचंद कदम, गणेश कदम, भरत चन्ने, संतोष आव्हाळे, मनोज तिवारी, अभिजित खरोटे, आणि अनिल आव्हाळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

केतन आव्हाळे यांच्या निवडीचे स्वागत विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडूनही करण्यात आले आहे. मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या रूपाने भाजपला एक सक्रिय आणि समर्पित कार्यकर्ता मिळाला असून, आगामी काळात ते पक्षाच्या कामाला अधिक गती देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here